जाहिरात

Bachchu Kadu: बच्चू कडू मोठ्या गुन्ह्यात अडकणार? आमदाराच्या भावाला संपवण्याचा कट, अपघाताचा बनाव अन्..

अभिजीत दिवाकरराव तायडे (वय 40) यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली असून बच्चू कडू यांच्यासह गोलु माहुरे याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Bachchu Kadu: बच्चू कडू मोठ्या गुन्ह्यात अडकणार? आमदाराच्या भावाला संपवण्याचा कट, अपघाताचा बनाव अन्..

शुभम बायस्कार, अमरावती: 

Bacchu Kadu News:  एकीकडे अशोक खरात प्रकरणात राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांचे कनेक्शन समोर येत असतानाच आता अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर  आली आहे. प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघात भासवून भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार येथे माजी मंत्री बच्चू कडू व गोलू माहुरे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. 

Ashok Kharat: "खरातकडे स्वेच्छेने जाणाऱ्या महिलांवरही कारवाई करा" ज्येष्ठ साहित्यिकीचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यावर अचलपूर मतदार संघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांचा खुनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार अभिजीत दिवाकरराव तायडे (वय 40) यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली असून बच्चू कडू यांच्यासह गोलु माहुरे याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला असून या कटात शुभम उर्फ गोलू माहोरे यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आळे आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासंबंधीचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचेही तक्रार दारांनी नमूद करण्यात आले आहे. या संभाषणाची मोबाईल रेकॉर्डिंग करून पुरावा पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. 

Crime News: आई नव्हे चेटकीण! मुलाला बरं करण्यासाठी दिला लेकीचा बळी, हत्येनंतर गुप्तांगात काठी अन्...

रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह पोलिसांकडे जमा झाला असून चांदूर बाजार पोलिसांनी BNS कलम 55, 58, 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करीत असून बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com