Amravati News: लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता, अमरावतीत खळबळ! पैसे काढले अन्...

महत्त्वाचे म्हणजे वैभव मोहोड याचा बुधवारी  (14, मे) विवाहसोहळा संपन्न होणार होता. त्याआधीच तो बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायास्कार, अमरावती: अमरावतीमधून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमध्ये लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून सध्या मुलाचा शोध सुरु आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड या बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे वैभव मोहोड याचा बुधवारी  (14, मे) विवाहसोहळा संपन्न होणार होता. त्याआधीच तो बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Advertisement

वैभव मोहोड हा  शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. उद्या त्यांचा लग्नसोहळा पार पडणार असून लग्नाची जय्यत तयारीही करण्यात आली आहे. त्याआधीच आज आज सकाळी सामान आणायला बाहेर जातो असं सांगून वैभव घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

महत्त्वाचे म्हणजे बेपत्ता झालेल्या वैभव याने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपय काढल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा  पोलीस करत आहेत. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world