शुभम बायस्कर, अमरावती: प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 9 वर्षांपूर्व पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणातून बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याच प्रकरणात त्यांना सहा महिन्यांची शिक्षाही ठोठावली होती. अखेर या प्रकरणातून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासोबत चार सहकाऱ्यांना पोलिसांना मारहाण करून शासकीय कामात अडथळे आणण्याचा प्रकरणात अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. 9 वर्षानंतर अचलपूर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
23 एप्रिल 2016 रोजी पोलीस कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांना परतवाडा एसटी डेपो समोर मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा तक्रारीच्या अनुषंगाने बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते 9 वर्षात 15 साक्षीदार तपासण्यात आले या प्रकरणात पूर्वी सहा महिन्याची बच्चू कडूंना शिक्षा देखील न्यायालयाने सुनावली होती.
मात्र या प्रकरणाचा अखेर निकाल लागला व बच्चू कडू यांच्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे बच्चूकडून हा मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीसच यामध्ये दारू पिऊन कर्तव्यावर वेळेवर हजर होता असं न्यायालयाने म्हणत बच्चू कडू यांची सुटका केली. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.
नक्की वाचा - EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती
याप्रकरणात चुकीच्या पद्धतीने आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न झाला. खोट्याचे खरे केले गेले. मात्र आता न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने आम्हाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती, ती सुद्धा नील झाली. त्यावेळी असलेल्या परिस्थितीनुसार हा प्रकार घडला होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.