Amravati physical Abuse Case: नाशिकनंतर अमरावतीमधून समोर आलेल्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. अमरावतीमध्ये एका १९ वर्षीय तरुणाने अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शोषण केल्याचं समोर आले आहे. अहदम अयान असं या आरोपीचे नाव असून त्याने अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ काढत त्यांना ब्लॅकमेल केल्याचेही उघडकीस आले आहे. याचप्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आरोपी अहमद अयान मुलींना कसा फसवायचा?
अमरावतीच्या परतवाडा परिसरात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांच्या तपासादरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे. ज्या फ्लॅटमध्ये हे घृणास्पद गुन्हे घडल्याचा आरोप आहे, तो फ्लॅट पोलिसांनी शोधून काढला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, मुख्य आरोपी अहमद अयान हा अल्पवयीन मुलींना अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका निवासी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घेऊन जात असे. याच फ्लॅटमध्ये मुलींचे शोषण करण्यात आले आणि अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले.
आरोपी अयान प्रत्येक वेळी फ्लॅट वापरण्यासाठी आपल्या मित्राला ५०० रुपये देत असे, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत फ्लॅट मालक आणि आरोपीच्या मित्राला अटक केली आहे. तपासात असे उघड झाले आहे की, मुलींना वारंवार या फ्लॅटमध्ये आणले जात होते. बुधवारी, पोलिसांच्या एका पथकाने स्वतः फ्लॅटची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले.
कोचिंग सेंटर वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, या संपूर्ण लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक दावा केला आहे. अमरावती शहरातील कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून पीडित मुली आरोपींच्या संपर्कात यायच्या असा आरोप बोंडे यांनी केला आहे. या आरोपानंतर अमरावतीचे आकाश इन्स्टिट्यूट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर इथे योग्य लक्ष दिल जात नाही, शिक्षणाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी इथे होत असतात. बाहेरची मुलं इथे येऊन अनेक कृत्य करतात, असा आरोप कापड व्यावसायिक शरद मिश्रा यांनी केला आहे.
Dombivli News: डोंबिवलीत भाजी मार्केटमध्ये मोठी कारवाई! तब्बल 114 दुकाने सील; नेमकं काय सुरु होतं?