जाहिरात

Nanded News: महापालिकेचा भयंकर निष्काळजीपणा, 4 चिमुकल्यांचा जीव गेला, हृदयद्रावक घटनेने नांदेड हळहळलं

खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. 

Nanded News: महापालिकेचा भयंकर निष्काळजीपणा, 4 चिमुकल्यांचा जीव गेला, हृदयद्रावक घटनेने नांदेड हळहळलं

Nanded 4 Children Drowned News: नांदेड शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.  नांदेड शहरातील देगलुर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरामध्ये महापालिकेकडून नाल्याचे काम  सुरू आहे. यावेळी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. 

Dombivli News: डोंबिवलीत भाजी मार्केटमध्ये मोठी कारवाई! तब्बल 114 दुकाने सील; नेमकं काय सुरु होतं?

नांदेडमध्ये 4 चिमुकल्यांचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  शहराच्या विकासकामांच्या नियोजनाचा अभाव आणि महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा आज एका भीषण दुर्घटनेला कारणीभूत ठरला आहे. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात महापालिकेकडून सुरू असलेल्या नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार निष्पाप बालकांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.

​देगलूर नाका भागात गेल्या काही दिवसांपासून नाल्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रशासनाने मोठे खड्डे खोदून ठेवले होते. मात्र, या खड्ड्यांभोवती कोणतीही संरक्षक भिंत किंवा सुरक्षेचे फलक लावण्यात आले नव्हते. परिसरात खेळत असताना ही मुले अचानक या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात पडली. मृतांमध्ये मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज (वय १०), मोहम्मद अली मोहम्मद इदरीस (वय १३), सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय १३) आणि अन्य एका बालकाचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपुरा भागातील रहिवासी होते.

​या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. महापालिकेच्या ठेकेदाराने खोदलेले खड्डे तसेच उघड्यावर सोडल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Malad News: बकऱ्याचं काळीज, कोंबडी अन् दारु.. मालाडमधील रिधमबाबाचा भयंकर प्रताप; धक्कादायक VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com