Amravati News: 'जगणे असह्य होत आहे...', निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने मृत्यूला कवटाळलं

राजेश पाटील यांना मधुमेहाचा आजार होता, शिवाय मागील काही वर्षांपासून त्यांना किडनीचाही आजार जडला होता. जवळपास 20 किलो वजन या आजारामुळे कमी झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमरावती: अमरावतीमधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. निवृत्त पोलीस जामदाराने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचे म्हटले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

(नक्की वाचा-  Delhi: दिल्लीमध्ये 'त्या' कारची जप्ती मोहीम, पेट्रोल भरायला गेलेली मर्सिडीज सील, प्रकरण काय?)

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती शहर पोलिस दलातून तीन वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या एका ६१ वर्षीय पोलिस जमादाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरून त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज राजापेठ पोलिसांनी वर्तवला आहे.
राजेश शंकरराव पाटील (वय 61) असे मृताचे नाव आहे.

राजेश पाटील २०२२ मध्ये अमरावती शहरातील फ्रेजरपुरा ठाण्यातून निवृत्त झाले होते.  दुपारी घरी कोणीही नसताना त्यांनी दोरीने गळफास घेतला. काही वर्षांपासून त्यांना किडनीचा त्रास, वजनही घटले होते, राजेश पाटील यांना मधुमेहाचा आजार होता, शिवाय मागील काही वर्षांपासून त्यांना किडनीचाही आजार जडला होता. जवळपास २० किलो वजन या आजारामुळे कमी झाले.

( नक्की वाचा :  Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली! )

त्यामुळेच राजेश पाटील यांनी आपले आयुष्य संपवले. या आजारामुळे आता जगणे असह्य होत आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेत आहे असा उल्लेख घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीमध्ये करण्यात आला आहे.  यावरून आजारपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात येत असल्याचे राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी सांगितले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Advertisement