जाहिरात

Delhi: दिल्लीमध्ये 'त्या' कारची जप्ती मोहीम, पेट्रोल भरायला गेलेली मर्सिडीज सील, प्रकरण काय?

Delhi vehicle scrappage policy: दिल्लीतल्या अनेक पॉश वस्त्यांमधील लाखो-करोडो रुपयांच्या आलिशान वाहनांना कुलूप लावले जात आहे. त्यावर  सीलची लाल पट्टी चिकटवली जात आहे.

Delhi: दिल्लीमध्ये 'त्या' कारची जप्ती मोहीम, पेट्रोल भरायला गेलेली मर्सिडीज सील, प्रकरण काय?
Delhi vehicle scrappage policy: आज दिल्लीच्या रस्त्यांवर एक विचित्र शांतता पसरली आहे.
मुंबई:


Delhi vehicle scrappage policy : जगामध्ये जेव्हा शान आणि प्रतिष्ठेच्या वाहनांची चर्चा होते, त्यावेळी मर्सिडीजचा उल्लेख टाळता येत नाही.  पण आज दिल्लीच्या रस्त्यांवर एक विचित्र शांतता पसरली आहे. जिथे कालपर्यंत मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यूसारखे आलिशान आणि चकचकीत वाहनं दिमाखाने धावत होते, तिथे आता त्या कारचे मालक घाबरले आहेत. कारण जुन्या वाहनांवर दिल्ली सरकारकडून सुरु असलेली कठोर कारवाई अखेर सीलिंगपर्यंत पोहोचली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिल्लीतल्या अनेक पॉश वस्त्यांमधील लाखो-करोडो रुपयांच्या आलिशान वाहनांना कुलूप लावले जात आहे. त्यावर  सीलची लाल पट्टी चिकटवली जात आहे. या कारवाईमुळे काही जण आश्चर्यचकित झाले असून काही जण खूपच नाराज आणि हतभल झाले आहेत. देशाची राजधानीतील हवा  हवा श्वास घेण्यायोग्य बनवण्याच्या या मोहिमेत आता कोणत्याही मर्सिडीजलाही सोडले जाणार नाही, हे या कारवाईतून स्पष्ट केले आहे. 

काय आहे कारण?

दिल्लीत आज (मंगळवार 1 जुलै) डिझेल आणि पेट्रोलची 10-15 वर्षांहून अधिक जुनी वाहने स्क्रॅप करण्याची आणि त्यांना इंधन न देण्याची मोहीम सुरू आहे. या अंतर्गत मर्सिडीजपासून अनेक दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. आश्रम येथील पेट्रोल पंपावर एक व्यक्ती आपली 15 वर्षांहून जुनी मर्सिडीजमध्ये इंधन भरण्यासाठी पोहोचले होते, पण ते पोहोचताच त्यांची कार सील करण्यात आली. 

( नक्की वाचा : Air India: 900 फूट खाली आले होते विमान...! दिल्लीहून निघालेल्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला )
 

आपले आलिशान वाहन सील झाल्याने मालक खूप दुःखी आहेत. त्यांच्या दुःखी असण्याचं कारण हेही आहे की, त्यांची गाडी 15 वर्षांहून जुनी असली तरी ती अजूनही चकचकीत दिसत आहे. याचप्रमाणे असे अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे अशाच गाड्या आहेत ज्या जुन्या असल्या तरी त्यांनी त्यांची इतक्या प्रेमाने काळजी घेतली आहे की त्या अजूनही नवीन वाटतात.

दिल्लीत  कडक सुरक्षेखाली जुन्या गाड्यांना पेट्रोल-डिझेल देण्यावर बंदी घालण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली सरकारने अशा वाहनांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय राजधानीतील सुमारे 350 पेट्रोल पंपांवर स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरे (ANPR) लावले आहेत. परिवहन विभागाने आपल्या संघटना, दिल्ली पोलीस, वाहतूक पोलीस आणि दिल्ली महानगरपालिका (MCD) यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करुन विस्तृत योजना तयार केली आहे.  परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची अनेक पथके दक्षिण दिल्लीतील विविध पेट्रोल पंपांवर तैनात करण्यात आली आहेत.

Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली!

( नक्की वाचा :  Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली! )

पेट्रोल पंपावर इंधनही नाही

ही मोहीम मंगळवारी सकाळी 6 वाजता सुरू झाली, ज्यात 15 वर्षांहून अधिक जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना आणि 10 वर्षांहून अधिक जुन्या डिझेल वाहनांना इंधन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. चिराग दिल्लीतील ढिंगरा पेट्रोल पंपावर परिवहन अंमलबजावणी आणि दिल्ली वाहतूक पोलिसांचे पथक सकाळपासूनच तैनात असलेले दिसले. परिवहन अंमलबजावणी पथकाचे उपनिरीक्षक धर्मवीर म्हणाले, "आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून येथे आहोत जेणेकरून कोणत्याही जुन्या वाहनात इंधन भरले जाणार नाही. पेट्रोल पंपांना अशा वाहनांना इंधन न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

एआयच्या मदतीने कारवाई

ते म्हणाले की जुन्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी पंपावर कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) चालणारे कॅमेरे आणि स्वयंचलित हूटर प्रणाली देखील लावण्यात आली आहे. धर्मवीर म्हणाले, "जर असे कोणतेही वाहन आले, तर कॅमेरे त्वरित त्याचा शोध घेतात आणि कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यासाठी हूटर वाजवतात." ते म्हणाले की अशा प्रकरणांमध्ये वाहने जागेवरच जप्त केली जातात. दिल्ली वाहतूक पोलिसांचे सहायक उपनिरीक्षक जगन लाल म्हणाले की ते त्यांच्या केंद्रीय डेटाबेसचा वापर करून वाहनांच्या तपशिलांची पुष्टी करत आहेत.

ढिंगरा पेट्रोल पंपाचे कर्मचारी हृदय राम म्हणाले, 'आम्हाला कोणत्याही जुन्या वाहनात इंधन न भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कॅमेऱ्याद्वारे किंवा आम्हाला अशा वाहनाचा शोध लागताच, आम्ही त्वरित पोलीस किंवा अंमलबजावणी पथकाला सतर्क करतो..'

दिल्लीतील हवा स्वच्छ करण्याची मोहीम

हा निर्णय वायुप्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात दिल्लीत 10 वर्षांहून जुन्या डिझेल वाहनांवर आणि 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घातली होती. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या 2014 च्या आदेशातही सार्वजनिक ठिकाणी 15 वर्षांहून जुन्या वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालण्यात आली होती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com