उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या त्यांचा ग्लॅमरस लूक आणि गाण्यांसाठीही खूप चर्चेत असतात. याशिवाय विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी केलेली वक्तव्यही चर्चेचा विषय ठरतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा फटका फडणवीसांना बसला होता. एका कार्यक्रमात त्या असं म्हणाल्या की, देवेंद्र 30-35 पुरणपोळ्या आणि पातेलंभर तूप अगदी सहज खातात. यानंतर फडणवीसांसाठी प्रत्येक कार्यक्रमात पुरणपोळी वाढली जात असल्याने ते पुरते त्रस्त झाले होते. शेवटी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर प्रतिक्रियाही दिली होती.
नक्की वाचा - राहुल गांधींची अमेरिकेतून RSS वर वादग्रस्त टीका, भाजपानं दिलं इंदिरा गांधींचा दाखला... प्रकरण काय?
अमृता फडणवीसांचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. सन मराठी या चॅनलवरील या मुलाखतीच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस म्हणाल्या की, धरण उशारा, कोरड घशाला ही म्हण ऐकताच देवेंद्र फडणवीस माझ्या डोळ्यांसमोर तरळतात. कारण ते समोर असले तरी त्यांच्यासोबत वेळ घालवता येत नाही, मस्ती करता येत नाही.
Video पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
त्यांना राजकारण सोडून काही कळत नाही...
देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का, या प्रश्नावर अमृता नाही म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ते खूप प्रॅक्टिकल आहेत. मी रोमँटिक आहे. त्यांना रोमान्स जमत नाही आणि कळत नाही. त्यांना राजकारण सोडून काही कळत नाही.