आसाराम बापूला राजस्थानमधून रायगडमध्ये आणले, काय आहे कारण?

आसाराम बापूला खालापूर तालुक्यातील माधवबाग आयुर्वेदिक येथे कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले आहे. आसाराम बापूला हृदयासंबंधित  त्रास जाणवू लागल्याने त्याच्या भक्तांकडून जोधपूर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबूब जमादार, रागगड

आसाराम बापू बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मागील 11 वर्षांनंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. आसाराम बापूला काल रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम बापूला उपचार घेण्याची परवानगी दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर त्याला आयुर्वेदिक रुग्णालयात आणण्यात आले.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आसाराम बापूला खालापूर तालुक्यातील माधवबाग आयुर्वेदिक येथे कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले आहे. आसाराम बापूला हृदयासंबंधित  त्रास जाणवू लागल्याने त्याच्या भक्तांकडून जोधपूर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार 7 दिवसांच्या पेरोलवर आसाराम बापूला इथे उपचार घेण्याची मुभा देण्यात आली आहे.  आसाराम बापूच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे  माधवबागतर्फे सांगण्यात आले आहे.

(नक्की वाचा - अकोला हादरलं! पोटच्या लेकीवर बापाचा अत्याचार, मामानंही सोडलं नाही)

माधवबाग येथे पंचकर्मवर आधारित संशोधन करुन आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात येतात. डायबेटिस, हृदयविकारासह अनेक आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने माधवबागमध्ये उपचार करण्यात येतात, अशी माहिती माधवबागमधील डॉ. राहुल जाधव यांनी दिली.

(नक्की वाचा- - पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड)

माधवबाग बाहेर पोलिसांचा कड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवीन येणाऱ्या रुग्णांना अपॉइंटमेंट असेल तरच सोडण्यात येत आहे. तसेच रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांना ही बाहेरच थांबवण्यात येत असल्याने याचा त्रास नातेवाईकांना होत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article