Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठलाच्या शरीरावरील खुणा आणि चिन्ह काय सांगतात?

पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती साधारणपणे 1200 ते 1300 वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज काही अभ्यासकांचा आहे. द्वापारयुगानंतरची आणि चालुक्यांच्या काळातील ही मूर्ती असल्याचे कायमच चर्चिले गेलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पंढरपूरचा सावळा विठुराया नेहमीच भक्तांचे मन मोहून घेतो. विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे. विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना एक आत्मिक ऊर्जा मिळते. त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती ही कायमच भक्तांसाठी श्रद्धेचा व आस्थेचा विषय राहिला आहे. 

पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती साधारणपणे 1200 ते 1300 वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज काही अभ्यासकांचा आहे. द्वापारयुगानंतरची आणि चालुक्यांच्या काळातील ही मूर्ती असल्याचे कायमच चर्चिले गेलं आहे. मात्र विठ्ठलच्या स्वयंभू मूर्ती बाबत कुठलेच इतिहासकार आणि संशोधक ठोस असा काळ सांगू शकले नाहीत. विठ्ठल मूर्तीवर अनेक चिन्हे आहेत. ही चिन्हे कायमच विठ्ठलाच्या मूर्तीचं वेगळेपण दाखवून देतात. विशेष म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीचे सौंदर्य हे त्याच्या करुणामयी डोळ्यात सामावले गेले असल्याचे वारकरी सांप्रदायिक लोक म्हणतात. त्यामुळे विठ्ठल मूर्ती ही भक्तांचा श्वास मानली जाते. याच विठ्ठल मूर्तीची नक्की काय वैशिष्ट्ये आहेत. हे जाणून घेऊया. 

  • विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे. या मूर्तीवर अनेक चिन्हे आहेत. जी चिन्हे विठ्ठलाच्या मूर्तीचे कायमच वेगळेपण दाखवताना दिसतात. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. 

नक्की वाचा - Chaturmas 2025 : आजपासून चातुर्मासाला सुरुवात; 4 महिन्यात चुकूनही 'या' गोष्टी करू नका

  • श्री विठ्ठल हरी आणि हराचे प्रती असल्याने मस्तकी शिवपिंड धारण केलं आहे
  • विठ्ठलाच्या दोन्ही बाजूस मकराकार कुंडले
  • गळ्याजवळ कौस्तुभ मणी
  • नाभी ही ब्रम्हदेवाचे उगमस्थान
  • उजव्या हातात कमलपुष्प
  • डाव्या हाती शंख
  • भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर देव उभे आहेत
  • कमरेला करदोडा
  • भृगुऋषींनी केलेल्या प्रहारामुळे देवाच्या छातीवर खूण
  • श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. 
  • कानी मकर कुंडले आहेत. 
  • गळ्यात कौस्तुभमणी आहे. 
  • पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. 
  • दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. 
  • श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. 
  • विठ्ठलाच्या पायावरील रुतलेली बोटं - मुक्तीकेशी नावाची एक दासी होती. तिला तिच्या सौदर्याचा गर्व होता. दर्शनाला आली तेव्हा तिने देवाच्या पायावर बोटं ठेवली. आणि ही बोटं पायात रुतली. त्याची खूण विठ्ठलाच्या पायावर दिसते. 

नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठल मूर्तीवरील असलेल्या चिन्हांचा साज हा कायमच उजागर होताना दिसतो.

Advertisement