
आजपासून चातुर्मास (chaturmas date 2025) आरंभ होत आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून (devshayani ekadashi 2025) म्हणजे 6 जुलैपासून चातुर्मासाची सुरुवात झाली आहे. या तिथीपासून विष्णू भगवान पुढील चार महिन्यासाठी निद्रावस्थेत असतात. या दरम्यान काही विशेष बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यादरम्यान अनेक जणं वांगी, कांदा आणि लसूण खाणं टाळतात. (chaturmas Started)
कांदा-लसूण का खात नाहीत?
चातुर्मासात कांदा आणि लसूण खाल्लं जात नाही. यामागे अनेक धार्मिक कारणं असल्याचं सांगितलं जातं. कांदा आणि लसूण यामागे आरोग्यसंबंधितही कारणं आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी असते त्यामुळे या काळात कांदा-लसूण यांसारखे जड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो.
चातुर्मासात या गोष्टी टाळा..
चातुर्मासात खोटं बोलणं किंवा काहीही चुकीचं काम करू नये.
पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत असतील. अशात काही गोष्टी वर्ज्य केल्या जातात. या दरम्यान शुभ काम करणं टाळावं असं सांगितलं जातं.
चातुर्मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन आदी कार्य करू नये.
चातुर्मासात कोणासाठीही वाईट शब्दाचा वापर करू नये. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटेल अशा शब्दाचा वापर करू नये.
चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे यादरम्यान बेडवर झोपणं वर्ज्यित मानलं जातं. या काळात जमिनीवर झोपावं.
यादरम्यान मांस, दारूपासून दूर राहा.
चातुर्मासादरम्यान निळा, काळ्या रंगाचे कपडे घालू नये. याऐवजी लाल, हिरवा, पिवळा, नारंगी आदी रंगाचे कपडे परिधान करावे.
नक्की वाचा - Devshayani Ekadashi 2025: देवशयनी एकादशीच्या दिवशी या मंत्रांचा करा जप, जीवनामध्ये येईल अपार सुख-समृद्धी
चातुर्मासात काय कराल?
चातुर्मासात पूजा-पाठ आणि दान करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
चातुर्मासात ब्रम्हचर्याचं पालन करावं आणि जमिनीवर झोपावं. असं केल्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होतो, असं म्हटलं जातं.
चातुर्मासात सात्विक भोजन करावं. यासोबत दान आणि नियमित पूजा करावी.
पुढील चार महिने सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. सोबतच
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world