Ashadhi Ekadashi 2025 : शेवटपर्यंत मुखी विठ्ठलाचं नाव; पंढरपुरच्या वेशीवर वारकऱ्याने सोडला जीव

विठ्ठलाच्या दर्शनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठलाच्या दर्शनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना एका वारकऱ्याचा मृत्यू (Warkari Death) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूरच्या (Pandharpur Darshan) वेशीवर परभणीच्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याने वारकऱ्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. साहेबराव मगर असं या वारकऱ्याचं नाव आहे. 

वाडीकुरोलीजवळ साहेबराव मगर या वारकरी भाविकांचा मृत्यू झाला आहे. तत्काळ वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिका न आल्याने वारकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. 

नक्की वाचा - Ashadhi Ekadashi 2025: 'दर्शन देरे...', भाविकांची रांग गोपाळपूरपर्यंत; एकादशीपूर्वीच विठ्ठल दर्शनासाठी 15 तासांचा कालावधी

माऊली दाभाडे यांच्या रथामागील 87 व्या दिंडीत साहेबराव मगर वारकरी सामील झाले होते. मूळचे परभणीचे असलेले साहेबराव मगर यांच्या मृत्यूमुळे वारीत खळबळ उडाली आहे.  

Advertisement
Topics mentioned in this article