
Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. उद्या 5 जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या पंढरपुरात (Pandharpur Darshan) दाखल होतील. त्यापूर्वीच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं दिसून येत आहे. एकादशीच्या दोन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
विठ्ठल मंदिरापासून 5 किमी दूरपर्यंत विठोबाची (Vitthal Darshan) पदस्पर्श दर्शन रांग पोहोचली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल 15 तासांचा कालावधी लागत आहे. उद्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींसह सर्व पालख्या वाखरीत येताच पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनसाठी लागणारा कालावधी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Ashadhi Wari: आषाढी वारीमध्ये घुसले अर्बन नक्षल! विधान परिषदेत मुद्दा गाजला! वाचा काय आहे प्रकरण?
रविवारी एकादशीचा सोहळा असून एकादशी पूर्वीच विठोबाच्या दर्शन रांगेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत दर्शन रांगेत किमान 50 हजार भाविक असल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world