Ashadhi Wari 2025 : संत मुक्ताईंची पायी दिंडी मराठवाड्यात दाखल; वारी सोहळ्याची 318 वर्षांची परंपरा कायम

6 जूनला मुक्ताबाईंच्या पालखीचे मुक्ताईनगरमधून प्रस्थान झालं असून 30 दिवसांच्या प्रवासानंतर मुक्ताईंची पालखी पंढरपूरात दाखल होईल.

जाहिरात
Read Time: 1 min

दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झालं आहे. जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केला आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, आदी शक्ती मुक्ताईबाई, आदी शक्ती मुक्ताईबाईचा गजर करीत भगवी पताका हाती घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत.

आदिशक्ती संत मुक्ताईच्या 318 वर्षाची परंपरा असलेल्या या मुक्ताबाईची पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे 6 जून रोजी संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान झाले. फुलांनी सजवलेल्या रथात चांदीच्या पादुका ठेवून पालखी मुक्ताईंचा व संतांच्या जयघोषात प्रवास करीत आहे. मुक्ताईचा पालखी सोहळा हा 600 किमी अंतर कापून पंढरपूरमध्ये दाखल होत असतो.

Advertisement

नक्की वाचा - Pandharpur Token Darshan : सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती! विठ्ठलाचं दर्शन अवघ्या एका तासात, अखेर टोकन दर्शन सुरू 

जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातून हा पालखीचा प्रवास असतो. 30 दिवसांच्या प्रवासानंतर 3 जुलैला मुक्ताईंची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होत असते. विठु नामाच्या गजरासह काळ्या आईची चिंता सावळ्या विठ्ठलाला असं म्हणत, मराठवाड्यातील शेतकरी या वारीत सामील होत असतात आणि मोठ्या भक्ती भावाने या पालखीच स्वागत केलं जातं असतं...

Topics mentioned in this article