Pune Palkhi 2025 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या भक्ती भावात देहूनगरीत संपन्न होत आहे. तुकोबारायांची पालखी दुपारी 2 च्या सुमारास प्रस्थान करणार आहे. या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहणार आहेत. (Tukaram maharaj palkhi prasthan 2025)
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी बांधव देहुनगरीत दाखल झाले आहे. सकाळी इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन या प्रस्थान सोहळयात दाखल होत आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025
18 जून : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम
19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम इंदापूर येथे गोल रिंगण
30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण
2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम माळीनगर येथे उभे रिंगण
3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम वाखरी येथे उभे रिंगण
6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात