संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Vitthal Rukmini Tulshi Archana Puja Online Registration: आषाढी वारीची लगबग आता सुरु झाली आहे. पुढील आठवड्यात दिंडी सोहळा सुरु होत असून मानाच्या पालख्यांचे प्रस्थान होणार आहे. अशातच विठ्ठल- रखुमाईच्या भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा भाविकांना करता येणार आहे. 1 ते 9 जुलै 2026 या कालावधीत ही पूजा होणार आहे. त्यासाठी आज, 30 जूनपासून सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू होत आहे.
Maharashtra Politics: उपसभापती पदासाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
कशी कराल नोंदणी?
विठ्ठलाच्या तुळशी पूजेचे बुकिंग आजपासून सुरू होणार आहे. आषाढीसाठी पालख्यांचे प्रस्थान झाले की पर्वकाळ सुरू होतो. याच पर्वकाळात अर्थात एक जुलैपासून विठ्ठलाच्या तुळशी अर्चन पूजा भाविकांना ऑनलाइन बुकिंग पद्धतीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहेत. यासाठी एका तुळशी पूजेमध्ये पाच भाविकांना थेट पूजा करून विठ्ठलाचे दर्शन दिले जाते.
यासाठी 2100 रुपये देणगी शुल्क मंदिरे समिती कडून आकारले जात आहे. याच तुळशी पूजेचे बुकिंग आज पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आषाढीच्या तोंडावर वारकरी भक्तांना दर्शनाचा सहज लाभ होणार आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात म्हणजे ७ जुलै पासून आषाढी वारी सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूहून पंढरपूरकडे ७ जुलै रोजी होईल व पालखी २५ जुलै रोजी पंढरपूर मध्ये पोहोचेल. तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करेल व २४ जुलै रोजी पंढरपूर मध्ये पोहोचेल. पंढरपुरमध्ये 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world