जाहिरात

Maharashtra Politics: उपसभापती पदासाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराला विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन ठाकरेंना पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. 

Maharashtra Politics: उपसभापती पदासाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला!  शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

Maharashtra Politics:  राज्याच्या राजकारणातून आणखी एक सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतीपदी पदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराला विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन ठाकरेंना पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे.

Pune News: केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! वकिलपत्रावरुन मोठा ड्रामा; सियाच्या भावाला 10 कोटींची नोटीस

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, सचिन अहिर शिंदे गटात 

शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर आमदाराही फुटणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे बोलले जात होते. अशातच आता ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत शिलेदार सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. 

आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे.  उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सचिन अहिर यांच्या पाठोपाठ ठाकरेंचे आणखी आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. 

Trending News: चिमुकल्याचा प्रताप, आईचा मनस्ताप! दारात आलेल्या पार्सलने झोपच उडाली; VIDEO तुफान VIRAL

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com