जाहिरात

Pandharpur Special Train: आषाढी वारीसाठी 54 विशेष ट्रेनची घोषणा; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग

Ashadhi Wari 202 Special Trains: आषाढी वारी 2026 साठी पंढरपुरात जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 54 विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Pandharpur Special Train: आषाढी वारीसाठी 54 विशेष ट्रेनची घोषणा; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग

विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे कूच करणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांचा प्रवास अधिक सुकर आणि सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वे सरसावली आहे. यंदा 25 जुलै रोजी साजरी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 54 आषाढी विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांमधून पंढरपूर आणि मिरजसाठी आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जातील, अशी अधिकृत माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आरक्षित विशेष गाड्यांचे वेळापत्रक 

या गाड्यांमध्ये 2 एसी थ्री-टियर, 10 स्लीपर क्लास आणि 6 जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश असेल.

नागपूर-मिरज आषाढी विशेष (4 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01205: 23 आणि 24 जुलै रोजी नागपूरवरून सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल. पंढरपूरला सकाळी 8 वाजता पोहोचून 8.25 वाजता सुटेल.
  • ट्रेन क्र. 01206: 24 आणि 25 जुलै रोजी मिरजवरून दुपारी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. पंढरपूरला सकाळी 3.55 वाजता पोहोचून 5 वाजता सुटेल.

न्यू अमरावती-पंढरपूर आषाढी विशेष (4 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01119: 21 आणि 24 जुलै रोजी न्यू अमरावतीवरून दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपुरात पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01120: 22 आणि 25 जुलै रोजी पंढरपूरवरून संध्याकाळी 7.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.50 वाजता न्यू अमरावतीला पोहोचेल.

(नक्की वाचा-  VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)

खामगाव-पंढरपूर आषाढी विशेष (4 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01121: 22 आणि 25 जुलै रोजी खामगाववरून सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपुरात पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01122: 23 आणि 26 जुलै रोजी पंढरपूरवरून पहाटे 5 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता खामगावला पोहोचेल.

अनारक्षित विशेष गाड्यांचे वेळापत्रक

भुसावळ-पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01159: 24 आणि 25 जुलै रोजी भुसावळवरून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01160: 25 आणि 26 जुलै रोजी पंढरपूरवरून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता भुसावळला पोहोचेल.

लातूर-पंढरपूर विशेष (8 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01101: 24, 27, 28 आणि 29 जुलै रोजी लातूरवरून सकाळी 7.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01102: त्याच तारखांना पंढरपूरवरून दुपारी 1.50 वाजता सुटेल आणि संध्याकाळी 7.20 वाजता लातूरला पोहोचेल.

कोल्हापूर-कुर्डूवाडी दैनिक विशेष (16 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01209: 22 ते 29 जुलै दरम्यान दररोज कोल्हापूरवरून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि दुपारी 1.30 वाजता कुर्डूवाडीला पोहोचेल. पंढरपूर दुपारी 12.15 वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01210: 22 ते 29 जुलै दरम्यान दररोज कुर्डूवाडीवरून संध्याकाळी 4.30 वाजता सुटेल आणि रात्री 10.30 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.  पंढरपूर संध्याकाळी 5.३० वाजता पोहोचेल.

(नक्की वाचा-  Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?)

पुणे-मिरज दैनिक विशेष (14 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01207: 23 ते 29 जुलै दरम्यान दररोज पुणे येथून सकाळी 8.40 वाजता सुटेल आणि संध्याकाळी 6.45 वाजता मिरजला पोहोचेल. पंढरपूरला दुपारी 3.55 वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01208: 23 ते 29 जुलै दरम्यान दररोज मिरजवरून संध्याकाळी 7.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता पुण्यात पोहोचेल. पंढरपूरला दुपारी 9.55 वाजता पोहोचेल.

बुकिंग आणि तिकिटांचे तपशील

आरक्षित तिकिटे: विशेष शुल्कासह धावणाऱ्या आरक्षित गाड्यांचे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
अनारक्षित तिकिटे: अनारक्षित डब्यांची तिकिटे रेल्वे स्थानकांवरील बुकिंग काउंटर आणि 'RailOne' मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे बुक करता येतील.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com