जाहिरात

Wari Accident: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत मोठी दुर्घटना, ट्रकच्या धडकेत 6 वारकरी जखमी

एका टेम्पोने धडक दिल्याने सहा वारकरी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Wari Accident: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत मोठी दुर्घटना, ट्रकच्या धडकेत 6 वारकरी जखमी

देवा राखुंडे, जेजुरी

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Accident:  महाराष्ट्रात आषाढी वारी दिंडी सोहळा सध्या सुरु आहे. या वारी सोहळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधील  वारकऱ्यांचा  मोठा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. एका टेम्पोने धडक दिल्याने सहा वारकरी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टेम्पोची धडक, सहा वारकरी गंभीर जखमी 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळ टेम्पोच्या धडकेत सहा वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टेम्पोने वारकऱ्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. गंभीर जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेजुरीच्या जवळ हा गंभीर अपघात घडला आहे 

वारकऱ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. माऊलींची पालखी आज सासवड मधून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवते जेजुरीत दाखल झाल्यावर ती पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते, आशातच हा वारीमधीलच टेम्पो वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला आणि यामध्ये जवळपास सहा वारकरी गंभीर जखमी झालेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com