Pandharpur news: दारूचा हवा तो ब्रँड, हवा तो फ्लेवर! पालखी मार्गावर मोठा दारू साठा, किंमत ऐकून हैराण व्हाल

या धाडीत घरात ठेवण्यात आलेली दारू पोलिसांनी ताब्यात घेतली. हा मोठा दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे अवैध दारू विक्रीचं प्रकरण उघडकीस आले आहे
  • पोलिसांनी पालखी मार्गावरून आणि घरातून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करून अवैध विक्रेत्यांना अटक केली आहे
  • दारू विक्रीसाठी दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा वापर करून विक्री गुप्तपणे केली जात होती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी 

आषाढी एकादशी जवळ आली आहे. राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने येत आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या ही पंढरपुरात पुढच्या काही दिवसात येतील. एकीकडे वारकरी विठू नामाच्या गजरात दंग असताना याच पालखी मार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्व जण हादरून गेले आहेत. पालखी मार्गावर चक्क दारू विक्री केली जात होती. पोलीसांनी ही वेळीच हेरलं आणि या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना सापळा रचून अटक केली आहे.   

पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. आषाढी वारीच्या कालखंडात मद्य विक्री बंद असते. हे पाहून काहींनी दारूची साठवणूक केली होती. तर काही जण वाहनातून दारू विक्री करत असल्याची माहिती पंढरपूर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता.  पंढरपूर शहरातील एका घरामध्ये पोलिसांनी अचनाक धाड टाकली. या धाडीत घरात ठेवण्यात आलेली दारू पोलिसांनी ताब्यात घेतली. हा मोठा दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: ख्रिस्त बांधवाना पंढरीच्या विठूरायाचा लळा! वारीत सहभागी होत दिला 'हा' मोठा संदेश

तर काही जण चार चाकी आणि दुचाकीच्या माध्यमातून वारी मार्गावरच दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावर ही कारवाई करत पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारू साठ्यासह एक दुचाकी व चार चाकी जप्त केली आहे. यातूनच ही दारू विक्री केली जात होती. कोणाल संशय येवू नये यासाठी या वाहनांनाचा वापर केला जात होता. या कारवाईत तब्बल अकरा लाख रुपयां पेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Success Story: वडिलांचे स्वप्न साकार करणारी लेक! लग्नानंतर ही नाही मानली हार, पाच वेळा अपयश आलं पण शेवटी...

महत्त्वाचे म्हणजे पंढरपूर शहरात येणाऱ्या पालखी मार्गावरच हा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे वारीत अवैध दारू विक्रीवर चाप घालण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे  यांनी दिली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यावर पोलिसांनी आपला फास आवळला आहे. कोणत्या ही स्थिती हे अवैध धंदे होणार नाहीत याची काळजी पोलीस घेत आहेत. पोलिसांची या अवैध धंद्यावर सध्या बारीक नजर आहे.