Ashok Kharat case : हाताची बोटं आणि तंत्र-मंत्र विद्येचा संबंध काय? अनामिका कधी कापतात? अंधारेंचा मोठा दावा

अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकार परिषद घेत मोठी मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Nashik News : नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने महिलांवर केलेल्या लैंगिक छळाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरुन गेला. खरात याचे अनेक राज्यातील अनेक नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. 

मात्र यामध्ये अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो समोर आले. विरोधकांनी चाकणकरांने फोटो शेअर करीत त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यातही चाकणकर यांच्या अनामिकेला जखम झालेले, बँडेज लावल्याचे अनेक फोटो शेअर करीत तंत्र-मंत्र केल्याचाही आरोप केला जात आहे. 

Advertisement

अनामिका आणि तंत्र-मंत्राचा कसा आहे संबंध?  सुषमा अंधारे काय म्हणाल्या? 

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांचे फोटो शेअर करीत त्यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. बोल भिडू नावाच्या एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुषमा अंधारे म्हणाल्या, माझ्याकडे चाकणकरांचा एक फोटो आला होता. यामध्ये एका व्यक्तीने  दिलेल्या माहितीनुसार, चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात आणि त्यांनी हाताची अनामिका कापली आहे. मला याबाबत फारसं माहीत नव्हतं. अनामिका कधी कापली जाते याबाबत गुगलवर माहिती शोधली. तेव्हा मला कळालं की, एखाद्या माणसाला वशीभूत करताना अशा प्रकारे अनामिका कापली जाते.

नक्की वाचा - Rupali Chakankar : भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप, थेट अटकेची मागणी

अनामिका कापताना सुर्य ग्रहाच्या ठायी यश आहे, शुक्र ग्रहाच्या ठायी आकर्षण आहे. दोन्ही ग्रह अनुकूल करुन त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अशा प्रकारचा विधी केला जातो. हा विधी अमावस्या किंवा पौर्णिमेला केला जातो. साधारण ९ सप्टेंबरला चाकणकरांचा पहिला फोटो दिसतोय आणि २८ डिसेंबरला शेवटचा फोटो दिसत आहे. सप्टेंबरचे जेव्हा आम्ही दिनविशेष तपासले तेव्हा २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्या दिसते. स्वयंपाक घरात जर जखम झाली असेल तर ती १५ दिवसात भरते. एक जखम चार महिले कशी राहू शकते असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. चाकणकरांनी नार्को टेस्ट करा अशी मागणीही अंधारे यांनी केली आहे.  

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी...

नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये ते म्हणाले, अशोक खरातच्या या भयंकर शोषणाच्या प्रकरणात फलज्योतिष हे प्रमुख साधन म्हणून वापरले गेले. स्वतःला तो अंक आणि हस्तरेषाशास्त्राचा तज्ज्ञ म्हणून मिरवत होता. प्रत्यक्षात फलज्योतिष ही मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल करणारी बुवाबाजी आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण आणावे. महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती स्पष्टपणे सांगते की श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते; परंतु श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण, फसवणूक आणि अत्याचार हे गुन्हे आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ शकत नाही.

आरोपी व्यक्तीचे विविध राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करून त्यांचीही चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबद्दल स्वतंत्र निवेदन करा


(NDTV Marathi अंधश्रद्धेला खतपाणीही घालत नाही. वरील माहिती ही त्या प्रकरणाशी संबंधित आहे)