जाहिरात

IPS Tejaswi :चौथीतील 'ती' घटना टर्निंग पॉईंट ठरली, बेशिस्त विद्यार्थिनी अशी बनली IPS; आता 'खरात'चा छडा लावणार!

ना आजूबाजूला सीसीटीव्ही, ना पुरावा...अपघात वाटणारं प्रकरण निघालं शांत डोक्यानं केलेला खून...महाराष्ट्राच्या शेरलॉक होम्स यांनी असा लावला प्रकरणाचा छडा, त्यांनीच सांगितला घटनाक्रम...

IPS Tejaswi :चौथीतील 'ती' घटना टर्निंग पॉईंट ठरली, बेशिस्त विद्यार्थिनी अशी बनली IPS; आता 'खरात'चा छडा लावणार!

IPS Tejaswi Satpute : भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. दिवसेंदिवस खरात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. खरातचा गुन्हांचा उलगडा करण्यासाठी एका एसआयटीचं गठण करण्यात आलं आहे. या एसआयटीच्या प्रमुख म्हणून अहिल्यानगरच्या  आयपीएस तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत संवेदनशील आणि प्रगल्भ अशा तेजस्वी या खरातचा छडा लावतील असा सर्वांना विश्वास वाटतो. गेल्या १२ वर्षांमध्ये तेजस्वी यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये मोठी कामगिरी केली. मात्र त्यांचा आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. बालपणात बेशिस्त आणि आळशी असणाऱ्या तेजस्वी यांचा अधिकारीपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 

 
'आईने पुस्तकं जाळायला काढली होती, तेव्हा मी भानावर आले...'

तेजस्वी सातपुते यांनी NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या बालपणाचा अनुभव कथन केला. तेजस्वी यांची आई प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. आपल्या लेकीने खूप अभ्यास करावा, मोठं व्हावं असं इतर आईंप्रमाणे त्यांच्याही आईची इच्छा होती. मात्र लहानपणी तेजस्वी या बेशिस्त आणि आळशी होत्या.  प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना शिकवणारे शिक्षक त्यांच्या आईकडे तक्रार करायचे. मग घरीही माझी  शाळा भरायची, असं तेजस्वी यांनी सांगितलं.

चौथीतील किस्सा सांगताना त्या म्हणाल्या,  मी चौथीत असताना आईने सरावासाठी व्यवसायमाला घरी आणली होती. मात्र दिवाळीच्या सुट्टीपर्यंत मी त्यावर नावदेखील घातलं नव्हतं. आईने दिवाळीच्या साफसफाईदरम्यान ती व्यवसाय माला पाहिली आणि ती प्रचंड चिडली. इतर मुलांना शिकायला मिळत नाही. आपल्याला संधी असतानाही शिकत नाही. त्यामुळे या व्यवसायमालाची शेकोटी करू... तुम्हाला शिक्षण घ्यायचं नसेल तर पुस्तक घरात कशाला हवीत. यानंतर मला खूप वाईट वाटलं. मी आणि माझ्या बहिणीने आईचे पाय धरले. तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. मी त्यावर्षी खूप अभ्यास केला. त्याची परिणती म्हणून शाळेत पहिली आणि केंद्रात दुसरी आले. 

नक्की वाचा -अहिल्यानगरची लेक भोंदूबाबाचा काळ ठरणार; 'खरात'चा छडा लावणाऱ्या IPS तेजस्वी सातपुतेंचा जबरदस्त इतिहास


लहानपणी पायलट होण्याची इच्छा होती, मात्र...

तेजस्वी यांनी लहानपणी पायलट व्हायचं होतं. मात्र चष्मा लागल्यानंतर ते होता येणार नाही हे कळलं. मग पायलट होण्याचं स्वप्न सोडलं. मी बीएससी बायोटेक्नोलॉजीला प्रवेश घेतला. तीन वर्षात मला रिसर्च करण्याची संधी मिळाली. पण आयुष्यभर आपल्याला संशोधन करायला आवडणार नाही हे लक्षात आलं. तीन वर्षानंतर माझ्याकडे अनेक पर्याय होते. मी पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथं युपीएससीच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाली. त्यावेळी मला स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाली. तेव्हा इथं वळण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या प्रयत्नात १९८ AIR वा क्रमांक मिळवून आयपीएस झाले.


महाराष्ट्राच्या शेरलॉक होम्स, असा लावला छडा

तेजस्वी सातपुते यांनी एका प्रकरणाचा उलगडा कसा लावला याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, मला एक अपघात झाल्याचा कॉल आला होता. यामध्ये व्यक्तीच्या डोक्याचे दोन भाग झाले होते. मी याचे फोटो पाहिले तर हा अपघात नाही, यात काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. मी पहाटेच जवळील पोलीस स्टेशनमध्ये गेले. घटनास्थळी  पेट्रोलिंग करताना अपघात झाला त्याच्या समांतर रस्त्यावर एक वाहन उभी असलेली दिसली. वाहनाला नंबर प्लेट नव्हती. आत कागद आणि एक रक्ताचा थेंब दिसला. गाडीचा झडती घेतली तेव्हा याचा मालक  शेजारच्या शहरातील असल्याचं कळालं. दोन दिवसांपूर्वी ओएलएक्सवर त्याने गाडी विकली होती. नव्या मालकाचा नंबर बंद होता, त्याचे कुटुंबीय किंवा मित्र कुणाचाच पत्ता लागत नव्हता. शेवटी अधिक खणत गेलो तेव्हा मृत व्यक्ती आणि त्या गाडीच्या नव्या मालकाचा संबंध असल्याचं समोर आलं. त्या दोघांमध्ये जमिनीचा व्यवहार सुरू होता. काही कारणाने तो विषय फिस्कटला होता. त्यामुळे आरोपीने अपघात वाटावा अशा पद्धतीने त्याची हत्या केली. आरोपी पैलवान असल्याने त्याने त्या व्यक्तीच्या डोक्यात एकच घाव घातला आणि तेथेच मृतदेह सोडून दिला. त्यामुळे सुरुवातील अपघात वाटणारी ती घटना पाच ते सहा तासात खूनात बदलली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com