जाहिरात

Jitendra Shelke: मोठी बातमी! शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षाचे अपघाती निधन, खरात प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट

शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचं समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातमध्ये मृत्यू झाला आहे. शिर्डीवरुन छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना ही भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. 

Jitendra Shelke: मोठी बातमी! शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षाचे अपघाती निधन, खरात प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट

राहुल वाघ, नाशिक:

 Shivnika Trust Vice President Accident:  नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशोक खरातशी संबंधित असलेल्या शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षाचे अपघाती निधन झाले आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचं समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातमध्ये मृत्यू झाला आहे.  छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना ही भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे अशोक खरात प्रकरणी शिवनिका संस्थान वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले आहे. समृद्धी महामार्गावर कार ट्रकखाली चिरडून ही भयंकर घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीतडे जात असताना हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. गाडीमध्ये शेळके यांची पत्नी आणि मुलगाही असून दोघेही गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! स्वच्छतागृहे मोफत, स्वस्तात चहा- नाश्ता, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

जितेंद्र शेळके यांची कार उभ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. अशोक खरात प्रकरणात शिवनिका ट्रस्टचे नाव वारंवार समोर येत आहे. याप्रकरणी तपास सुरु असून अनेक खुलासे होणे बाकी आहे. अशातच ट्रस्टच्या उपाध्यक्षतांचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या नेमका अपघात आहे की घातपात? याबाबतही आता चर्चा रंगल्या आहेत. 

सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संशय

"जितेंद्र शेळके याच्या मृत्यूती बातमी  शॉकिंग आहे. अनेकांनी अंदाज वर्तवले होते की खरात किंवा त्याच्या निकटवर्तीयांच्या जीवाला धोका आहे. असंख्या लोकांनी आपलं म्हणणं मांडलं होतं. आता ही घटना घडणे हे कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी खऱ्या करणाऱ्या आहेत. यानिमित्ताने खरातच्या जीवाताच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेळकेच्या मृत्यूमुळे अनेक गोष्टी बाहेर येता येता राहतील की काय? अशी आता भीती वाटत आहे. असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. 

तसेच "आता माझ्या हाताशी काही नाही. मात्र यात घातपाताचा वास येत आहे. अशी भीती आधीच अनेकांनी व्यक्त केली होती. शिवनिका ट्रस्टच्या लोकांचे एकमेकांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे सर्वांच्याच जीवाताच्या सुरक्षिततेचा प्रश्न यातून निर्माण होत आहे.  खरातच्या जीवीताला धोका होऊ शकतो याला अधिक अधोरेखित करण्याचं काम या घटनेमुळे झालं आहे." असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. 

(नक्की वाचा-  Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com