जाहिरात

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! स्वच्छतागृहे मोफत, स्वस्तात चहा- नाश्ता, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

महामंडळाचे बळकटीकरण करण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने ८ हजार नवीन बस ताफ्यात सामील करणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! स्वच्छतागृहे मोफत,  स्वस्तात चहा- नाश्ता, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

विशाल पुजारी, कोल्हापूर: 

MSRTC Big Desicion:  राज्यातील एसटी प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एसटीच्या ताफ्यात लवकरच ८ हजार नवीन बस दाखल होणार असून, १ जूनपासून राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Weather Update: उन्हात आता पावसाचे सावट; 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा 'यलो अलर्ट'

मोफत स्वच्छतागृहे, 30 रुपयात चहा नाश्ता...

​प्रताप सरनाईक यांनी आज कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी केवळ घोषणाच केल्या नाहीत, तर स्थानकातील अस्वच्छता आणि कॅन्टीनमधील अनागोंदी कारभारावर अधिकाऱ्यांचे कान टोचले. बसस्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना ३० रुपयांत चहा आणि नाश्ता देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील पाहणीत काही कॅन्टीनमध्ये दरपत्रकावर चिकटपट्ट्या लावून जादा दर आकारले जात असल्याचे निदर्शनास येताच मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ​एसटी महामंडळाचे बळकटीकरण करण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने ८ हजार नवीन बस ताफ्यात सामील करणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

परिवहन मंत्र्यांच्या मोठ्या घोषणा 

तसेच, प्रवाशांच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा विचार करून 'मोफत स्वच्छतागृह' ही संकल्पना १ जूनपासून अमलात आणली जाणार आहे. जर कोणत्याही स्थानकावर या नियमांचे उल्लंघन झाले किंवा कॅन्टीनचालकांनी जादा दर आकारले, तर त्यांचे परवाने रद्द करण्यापर्यंतची कडक कारवाई करण्याचे संकेतही सरनाईक यांनी दिले आहेत.

(नक्की वाचा-  Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com