महायुतीचे 'संकल्पपत्र' अन् मविआचा 'महाराष्ट्रनामा', कोणाचा जाहीरनामा प्रभावी? वाचा...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.दुसरीकडे महाविकास आघाडीनेही पंचसुत्री जाहीर केली आहे. महायुतीचे संकल्पपत्र आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामामध्ये आश्वासने अन् घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा धुरळा सुरु आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून आश्वासनांची खैरात सुरु आहे. आज भारतीय जनता  पक्षाने महाराष्ट्रासाठी संकल्पनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.दुसरीकडे महाविकास आघाडीनेही पंचसुत्री जाहीर केली आहे. महायुतीचे संकल्पपत्र आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामामध्ये आश्वासने अन् घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. काय आहे दोन्हींमध्ये फरक अन् कोणत्या घोषणा प्रभावी आहेत?  वाचा सविस्तर... 


काय आहेत महत्वाच्या घोषणा? 

महाविकास आघाडीच्या पंचसुत्रीमध्ये प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी तीन लाखांचा निधी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलेला प्रतिमाह ३ हजार रुपये, महिलांसाठी मोफत बससेवा तसेच शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत कृषीकर्ज माफी,बेरोजगारांसाठी ४ हजारापर्यंत मदतनिधी अशा काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या संकल्पपत्रामध्ये दरमहा 2100 रुपये म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीत वाढ,१० लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  

नक्की वाचा: आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?

संकल्पपत्र की महाराष्ट्रनामा, कोणाच्या घोषणा प्रभावी?

भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्रामध्ये महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार,व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही पुढील ५ वर्षात भर देण्यात येईल,असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या पंचसुत्रीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा, एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन 45 दिवसात निकाल लावण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. महत्वाचं म्हणजे भाजपने लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याची घोषणा केली  असतानाच काँग्रेसने महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 3,000 रुपये आणि  महिला आणि तरुणींसाठी बससेवा मोफत करण्याचीही महत्वाची घोषणा केली आहे. यामध्ये एकीकडे काँग्रेसने जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचे आश्वासन दिले आहे तर भाजपने बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करणार असल्याचे सांगितले आहे. थोडक्यात, भाजपचे संकल्पपत्र आणि काँग्रेसच्या पंचसूत्रीमध्ये महाराष्ट्रातील महिला वर्ग, तरुण, तरुणी बेरोजगार यांच्यासह शेतकरी वर्गासाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. 

ट्रेंडिग बातमी: मनोज जरांगेंचा 'लोकसभा पॅटर्न', "मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडू नका"