प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक बातमी; करवीरचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
कोल्हापूर:

आज विधानसभा निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. यंदा सहा पक्ष दोन आघाड्यांमध्ये वाटले गेल्याने मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काही अघटित घडू नये यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज आहे. दरम्यान कोल्हापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करवीरमधील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

नक्की वाचा - 'लुटली तिजोरी, केलीय गद्दारी, आता... 'उद्धव ठाकरेंनी सभा गाजवली, मोदी- शहांवर हल्लाबोल

प्रचारसभा करून परतताना मानवाडजवळ 6 ते 7 जणांकडून हे घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. करवीरमधील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांच्यावर काठी आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गाडीवर देखील दगडफेक करून हल्लेखोर शेतवडीतून पसार झाले. यानंतर तातडीने घोरपडे यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या संताजी घोरपडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.