बदलापूरच्या असंवेदनशील महिला पोलीस अधिकाऱ्याला आणखी एक दणका

पीडित चिमुकलींच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात (Badlapur Police Station) तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बदलापूरमधील (Badlapur Case) ज्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापाने धुमसतोय त्या प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. पीडित चिमुकलींच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात (Badlapur Police Station) तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती. या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या शुभदा शितोळे-शिंदे (Shubhada Shitole-Shinde) यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला होता. पीडित चिमुकलींसह त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात 12 तास बसवून ठेवण्यात आलं होतं. एक महिला असूनही अशा प्रकरणात एखादी व्यक्ती इतकी निर्दयी कशी काय असू शकते असा सवाल विचारला जाऊ लागला होता.  या शुभदा शितोळेंचे सरकारने निलंबन केलं होतं. आता या शितोळेंची सरकारने बदलीही केली आहे.

हे ही वाचा: 'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन' मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप

ज्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे त्यामध्ये 12 ठाणे शहरातील आहेत. अजय कल्याण आफळे, नंदकुमार रामराव कैचे, गंगाराम जैत्या वळवी, महादेव शिवाजी कुंभार, स्वाती अर्जुन पेटकर, शुभदा शितोळे-शिंदे, अशोक संभाजी भगत, चंद्रहार मानसिंह गोडसे, अनिल देवराम पडवळ, अनिल गोविंद जगताप, संदीप परमेश्वर धांडे, अतुल सुरेश अडुरकर अशी त्यांची नावे आहेत. नवी मुंबईतील दोघांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये विजयकुमार हाशन्ना पन्हाळे व संजीव दत्तात्रय धुमाळ यांचा समावेश आहे. या सगळ्यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे.

Topics mentioned in this article