11 days ago

बदलापुरातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळे त्या पाच पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अक्षय शिंदे याच्या शरीरवर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेला एन्काऊंटर फेक असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. सैफ अली खानच्या हल्ल्याचं वांद्रे पोलिसांकडून रिक्रिएशन करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस आरोपीला घटनेशी संबंधीत प्रत्येक स्थळावर घेऊन जाणार आहे.  

Jan 21, 2025 21:42 (IST)

Ahilyanagar News: संजय राऊतांच्या तोंडाला काळे फासल्यास 1 लाखांच बक्षीस, शिंदे गटाच्या नेत्याची घोषणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्ताव्यावरून अहिल्यानगरला दिल्ली गेट येथे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले आहे. तसेच संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासेल त्यास एक लाख रुपये बक्षीस यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव यांनी जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्याने खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन नागा साधू बरोबर जाऊन बसायला पाहिजे होत, नागा साधूही फार अस्वस्थ असतो असे वक्तव्य केले होते. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध करत अहिल्यानगर शहरात शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Jan 21, 2025 21:40 (IST)

Raj Thackeray Nashik Visit: राज ठाकरेंचा नाशिक दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर 

23 आणि 24 जानेवारी रोजी राज ठाकरे यांचा नाशिक दौरा 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा 

 मनसेच्या नाशिक मधील पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे घेणार बैठक

Jan 21, 2025 21:17 (IST)

Jaykumar Gore: भाजपा कार्यकर्त्याला त्रास देणारे कृत्य चालू देणार नाही: पालकमंत्री जयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना इशारा

सोलापूर जिल्ह्यातून कुणाचा राजीनामा घ्यायचा किंवा घ्यायचा नाही. हा पक्षाचा निर्णय असणार आहे. पण सोलापूर जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्याला त्रास देणारे कृत्य चालवून देणार नाही. असा मोहिते पाटील यांना थेट इशारा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. 

Jan 21, 2025 21:16 (IST)

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात नाराजी ? पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती

जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात नाराजी ? 

7 दिवसांपूर्वी नियुक्त करण्यात आलेले जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या पदाला देण्यात आली स्थगिती 

विष्णू भंगाळे हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता 

विष्णू भंगाळे हे पक्षात येऊन दोन महिने झाले व त्यांना जिल्हाप्रमुख पद दिल्याने काही शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा 

त्यामुळे विष्णू भंगाळे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला पक्षाकडून स्थगिती देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Advertisement
Jan 21, 2025 20:31 (IST)

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात नवा ट्वीस्ट; तपास अधिकाऱ्याची बदली

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सैफ अली खान प्रकरणातील  पहिला तपास अधिकारी बदलण्यात आला आहे.   पहिल्या प्रकरणाचे तपास अधिकारी पीआय दर्जाचे अधिकारी सुदर्शन गायकवाड होते.  आता या प्रकरणात अजय लिंगनूरकर यांना नवीन तपास  अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.  तपास अधिकारी बदलण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

Jan 21, 2025 20:02 (IST)

Davos 2025: दावोसमध्ये विक्रमी करार! एका दिवसात तब्बल 4,60,000 कोटींची गुंतवणूक

1) कल्याणी समूह

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000 

कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200

कोणत्या भागात :

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : गडचिरोली

7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी 

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

Advertisement
Jan 21, 2025 19:41 (IST)

Nalasopara News: नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवर 23 जानेवारीपासून पुन्हा तोडक कारवाई होणार

नालासोपारा पूर्वेच्या आचोळे वसंत नगरी येथे महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीवर 23 जानेवारीपासून पुन्हा तोडक कारवाई सूरू होणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशी महिलांनी नालासोपाराची आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात धाव घेतली आहे. या अगोदर येथील 41 इमारतीपैकी 6 अनधिकृत इमारती तोडण्यात आल्याबाहेत. उर्वरित 34 इमारतींवर 23 जानेवारीपासून तोडक कारवाई सुरू होणार असल्याने येथील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. काही पण करा मात्र आमची घर वाचवा असे म्हणत आमदारांच्या कार्यालयाबाहेर रहिवासी महिलांनी हंबरडा फोडला आहे. 

Jan 21, 2025 19:39 (IST)

Turkstan Fire: तुर्कस्थानमध्ये भीषण अग्नितांडव! 66 जणांचा होरपळून मृत्यू

तुर्कस्थानमधून एक भीषण आगीची बातमी समोर आली आहे. तुर्कस्थानमध्ये एका स्की रिसोर्टमधील इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये 66 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार 3 च्या सुमारास ही भयंकर आग लागली. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Advertisement
Jan 21, 2025 19:09 (IST)

Bharat Gogawale: रुवात त्यांनी केली, आम्ही थांबणार नाही: भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना इशारा

आम्हाला पालकमंत्री हवं आहे आणि ही स्थगिती दिली कारण उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.  सुनील तटकरे आमच्यामुळे  खासदार आहेत. आम्ही जर मदत केली नसती तर आज राष्ट्रवादीचा एकही निवडून आला नसता. सुरुवात त्यांनी केली आहे, त्यामुळे आम्ही थांबणार नाही

आमच्या लोकांनी जाळपोळ केली, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत.... राग व्यक्त करणारच. फक्त आम्ही कोणाचं नुकसान केलं नाही.  पालकमंत्री पद हवंच आहे यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. माझे कार्यकर्ते शुभेच्छा द्यायला गेले आहेत, असे म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला. 

Jan 21, 2025 19:02 (IST)

Nana Patole: धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा.. नाना पटोलेंची मागणी

महाराष्ट्र मध्ये सध्या ज्या घटना झाल्या आहेत, परभणी असेल बीड प्रकरण असेल ते आपण पाहिले. वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल केला नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी आम्ही करत आहोत. मुख्यमंत्री यांनी तातडीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा जनता भयभीत झाली आहे. जर पालकमंत्री पदाला स्थगिती मुख्यमंत्री परदेशात राहून देऊ शकतात तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेऊ शकतात 

विधिमंडळ समित्या संदर्भात सुद्धा काही नाव द्यायचे आहेत... दोन-तीन दिवसात विधानसभा अध्यक्षांना भेटून त्या देऊ. विरोधी पक्ष नेते पदा संदर्भात उद्धव ठाकरे शरद पवार आणि मी निर्णय घेऊ दोन-तीन दिवसात या संदर्भात निर्णय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या बाबत चर्चा झालेली नाही निवडणुका जाहीर होऊ द्या मग यावर निर्णय घेऊ, आम्ही एकत्र आहोत.. असं नाना पटोले म्हणालेत. 

Jan 21, 2025 19:00 (IST)

Solapur News: वाल्मिक कराडच्या मुलाला दिलासा, सोलापूर गुन्हा दाखल करण्यास नकार

- वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडला दिलासा

- सुशील विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही 

- हा गुन्हा सोलापुरात दाखल करता येणार नाही असे आदेश 

- हा गुन्हा सोलापूरच्या हद्दीत येत नाही असे कोर्टाचे आदेश

Jan 21, 2025 18:06 (IST)

MVA Meeting: महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक, कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत थोड्याच वेळात बैठक सुरु होत आहे. विधिमंडळातील विविध समितींवर कोणत्या पक्षातील किती सदस्य असतील याची चर्चा केली जाणार आहे. तसेच विधानसभेत कोणत्या पक्षातील विरोधी पक्षनेता असेल याची चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळ काही महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शक्यतो विधानपरिषदेवर काँग्रेसचा विरोधीपक्षनेता आणि सभेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधीपक्षनेता बसण्याची शक्यता आहे

महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी जयंत पाटील, नाना पटोले, नसीम खान, अभिजित वंजारी, अनिल परब आणि सुनिल शिंदे दाखल झाले आहेत. 

Jan 21, 2025 18:03 (IST)

Raigad Shivsena News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत भूकंप! रायगडमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

रायगड जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. भरत गोगावले यांची जोपर्यंत पालकमंत्री म्हणून घोषणा होत नाही तोपर्यंत संघटनेचे काम करणार नाही असे म्हणत भरत गोगावले समर्थकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. 

Jan 21, 2025 17:28 (IST)

Jalgaon News: जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाकडून तपासणी

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाकडून तपासणी 

आयकर विभागाच्या पथकाकडून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्या कार्यालयात तपासणी 

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाकडून अचानक तपासणी केली जात असल्याने उडाली खळबळ 

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाकडून तपासणीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट

Jan 21, 2025 17:27 (IST)

Manoj Jarange Patil: मंत्र्याच्या पाठिंब्याने संघटित गुन्हेगारीला पाठबळ, मनोज जरांगेंचा संताप

 सीसीटीव्हीमधील सर्व आरोपी पाहून खरंच धक्कादायक आणि चीड येणार आहे. राज्याने अशा गुंडगिरीचा आणि हप्ते वसुलीच्या टोळ्या या अगोदर बघितल्या होत्या.. काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली आहे. आजचा व्हिडिओ तर खूप धक्कादायक आहे.

 एका जागेवर बसून खंडणी मागायचा आणि खून करायचा जर कट शिजवायला लागले. सामूहिक कट करायला तर  संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले, तेही एका मंत्र्याच्या पाठिंब्याने. खंडणी मागणारे आणि कुणाचे आरोपी हे एकच आहेत ते वेगळे नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या सीसीटीव्हीवर भाष्य केले आहे. 

Jan 21, 2025 17:14 (IST)

Pune News: शरद पवार- अजित पवार पुन्हा एकत्र; पुण्यातील कार्यक्रमाला लावणार हजेरी

पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला काका पुतणे येणार एकत्र

पुण्यातील वी एस आय येथील होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर दिसणार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (वी एस आय) वार्षिक सभा व पारितोषिक वितरण समारंभ २३ जानेवारी रोजी होणार

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सभा आणि पारितोषिक समारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबासाहेब पाटील आणि वी एस आय चे विश्वस्त दिलीप वळसे पाटील राहणार उपस्थितीत

ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार, संस्थेतील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार

या समारंभाला राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार सुद्धा देण्यात येणार

Jan 21, 2025 16:37 (IST)

Saif Ali Khan Discharge: अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज; पाच दिवसांनी रुग्णालयातून बाहेर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून पाच दिवसांनी तो घरी जाणार आहे. गेल्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर आता पात दिवसांनी सैफ अली खान घरी परतला आहे. 

Jan 21, 2025 16:35 (IST)

Dhananjay Deshmukh: पुढील तपास वेगाने करणे गरजेचे आहे.. धनंजय देशमुख

एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.. त्यावर या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी यावर ॲक्शन घेतली पाहिजे त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल हे पहावे. पंकजा मुंडे यांचा फोन वहिनींना झाला होता..  आता सीसीटीव्ही फुटेजवर काय ॲक्शन घेता येईल हे महत्त्वाचे आहे.. झालेल्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आता कारवाई याकडे आमचे सर्वांचे लक्ष लागले आहेत..

या सीसीटीव्ही फुटेजच्या दिवशीचे एफ आय आर आहे.. फोन कॉल्स आहे..घटनाक्रम आहे तसाच आहे.. यावर आता ॲक्शन घेणे गरजेचे आहे.. पुढील तपास वेगाने करणे गरजेचे आहे. पोलीस अधिकारी राजेश पाटील त्या सीसीटीव्ही मध्ये आहेत.. या सर्वांची सखोल चौकशी करायला हवी. या आरोपींना ज्यांनी आश्रय दिला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे.. राजेश पाटील देखील त्यात आहे..

Jan 21, 2025 16:06 (IST)

Gautam Adani Visit Mahakumbh: उद्योगपती गौतम अदानींची महाकुंभमेळ्यात हजेरी

अदाणी समुहाचे संचालक गौतम अदाणी मंगळवारी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सहकुटुंब उपस्थित होते.  त्यांनी यावेळी महाप्रसाद बनवला. तसंच त्याचे फोटो शेअर केले.

Jan 21, 2025 15:41 (IST)

Maharashtra Politics: कोकणात उद्धव ठाकरेंना धक्का, तालुकाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा

कोकणात शिवसेनेच्या  ठाकरे गटाला धक्का 

 रत्नागिरीच्या तालुकाप्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा 

प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे दिला राजीनामा 

साळवी यांची विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख, तर तळागाळात देखील चांगला संपर्क 

 राजीनाम्यानंतर साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा

Jan 21, 2025 15:14 (IST)

Cm Devendra Fadnavis: दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोली साठी:

कल्याणी समूहाशी स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला असून पोलादसाठी गडचिरोतील 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केला. 

Jan 21, 2025 14:24 (IST)

Live Update : सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला...

सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला...

Jan 21, 2025 13:03 (IST)

Bhiwandi News: वाहन चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

वाडा - भिवंडी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांची लुटमान करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे.  वाडा तालुक्यातील शिरीष पाडा येथे टेम्पो चालकाला दोन मोटारसायकली वरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी टेम्पो चालकाला लोखंडी रॉड ने मारहाण करून, तसेच, त्याच्यावर धारदार सुऱ्याने वार करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती. 

वडा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तपास करून चार आरोपींना जेरबंद केलं आहे. या आरोपींमध्ये वाडा तालुक्यातल्या कुयलु गावातील नितीन दशरथ रावते, (29 वर्षे,), सावरखांड येथील प्रकाश सुकऱ्या मोर (32), तुसे गावातील, सनी रोहीदास मोकाशी ऊर्फ देशमुख (24) आणि भिवंडी तालुक्यातल्या कांदळी गावातील गणेश भीम जाधव यांना अटक केली आहे. 

Jan 21, 2025 13:02 (IST)

Nashik News: सटाण्याच्या बिजोटे ग्रामपंचायतला ठोकले टाळे

 नाशिकच्या सटाणा तालुक्यातील बिजोटे ग्रामपंचायत ग्रामसेवक 15 दिवसांपासून गैरहजर असल्याने ग्रामस्थांचे विविध दाखले व शासकीय कामे प्रलंबित आहे. याबाबत वरिष्ठाना कळवून दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ताळे ठोकले ठोकले. तातडीने ग्रामसेवक द्यावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

Jan 21, 2025 13:01 (IST)

Hingoli News: जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

हिंगोली शहराच्या मधोमध असलेल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आलेल आहे, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल जलेश्वर तलाव पालिकेने अतिक्रमण मुक्त केला आहे, दरम्यान जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम मागील वर्षे पासून  सुरू आहे. आणि आत्ता हे संपूर्ण काम प्रगतीपथावर असून हे काम पूर्ण झाल्यानंतर हिंगोलीच्या वैभवात नवीन भर पडणार आहे.. या

Jan 21, 2025 12:46 (IST)

Live Update : छगन भुजबळांना मोठा दिलासा, भुजबळांचा जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

छगन भुजबळांना मोठा दिलासा, भुजबळांचा जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांना दिलासा कायम

Jan 21, 2025 12:07 (IST)

Live Update : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मविआची आज बैठक

महाविकास आघाडी नेत्यांची आज बैठक होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता शिवालय इथे ही बैठक होणार आहे. विधानसभा निवडणूकिचे निकाल लागल्यानंतर ही पहिली बैठक होणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या पराभवानंतर शिवसेना आणि काँग्रेस पक्षात तेढ वाढला होता. पुढील निवडणूका या शिवसेना स्वबळावर लढणार असं वक्तव्य देखील संजय राऊत कडून करण्यात आलं होतं. काल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये भेट झाली. त्यानंतर आज आज महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. 

Jan 21, 2025 12:05 (IST)

Live Update : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची पहिली बैठक

महाविकास आघाडीची संध्याकाळी 5 वाजता बैठक

शिवालय येथे महाविकास आघाडीची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची पहिली बैठक

Jan 21, 2025 11:39 (IST)

Live Update : करिना कपूर लीलावती रुग्णालयात आज, आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

करिना कपूर लीलावती रुग्णालयात आज, आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता 

Jan 21, 2025 11:30 (IST)

Live Update : महाकुंभमेळ्यातून गौतम अदाणी Live

Jan 21, 2025 11:10 (IST)

Live Update : संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या 22 जानेवारीला पंढरपूरात आक्रोश मोर्चा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व सर्व इतर संघटना यांच्यासह सोलापूर जिल्ह्याच्या वतीने उद्या 22 जानेवारी रोजी पंढरपुरात आक्रोश मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. त्या मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजी राजे तसेच देशमुख कुटुंब उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मराठा समाजापेक्षा रेकॉर्डब्रेक गर्दीचा मोर्चा पंढरपुरात होईल असा विश्वास मराठा समाजाला आहे. गुन्हेगारांना मोका जरी लागला असला तरी चार्जशीट दाखल होईपर्यंत राज्यातील मोर्चे सुरूच राहणार आहेत. असे मराठा समाजाकडून सांगण्यात येते आहे. 

Jan 21, 2025 10:18 (IST)

Live Update : छत्तीसगड-ओडिसाच्या सीमेवर 12 माओवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावरुन स्फोटके जप्त

छत्तीसगड-ओडिसाच्या सीमेवर १२ माओवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावरुन स्फोटके जप्त

Jan 21, 2025 10:09 (IST)

Live Update : यास्मिन वानखेडे यांच्या बदनामी आणि पाठलाग केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरुद्ध पोलीस चौकशीचे आदेश

यास्मिन वानखेडे यांच्या बदनामी आणि पाठलाग केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरुद्ध पोलीस चौकशीचे आदेश

बांद्रा मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून देण्यात आले आदेश

Jan 21, 2025 09:29 (IST)

Live Update : घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघातात तीन जण ठार, दोन गंभीर जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघातात तीन जण ठार, दोन गंभीर जखमी

- ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाची समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक 

- धामणगावजवळ काल सायंकाळची घटना

- या अपघातामध्ये रिक्षा चालक अमोल घुगे आणि त्याच्या 4 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू 

- जखमींवर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू 

- कंटेनरचालकाला वाडीवऱ्हे पोलिसांनी घेतले ताब्यात

Jan 21, 2025 08:42 (IST)

Live Update : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा

 मुंबईकडे येणाऱ्या अप लाईंवरील रेल्वे ट्रॅक ला तडा

 मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

 वेळीच घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली

 रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती.

 अप लाईन वरील गाड्यांच वेळापत्रक खोळंबणार.

गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांवर थांबल्या.

Jan 21, 2025 07:55 (IST)

Live Update : राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता

राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता 

राज्यभरात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत झाली दुपटीने वाढ 

1 ते 16 जानेवारीदरम्यान राज्यात चिकुनगुनियाचे 130 रुग्ण आढळून आले आहेत

आरोग्य विभागाकडून राज्यभरात राबवण्यात येणार उपाययोजना

Jan 21, 2025 07:44 (IST)

Live Update : महाराष्ट्रात आणखी एका वाघाचा मृत्यू, 19 दिवसांत मृत वाघांची संख्या 9 वर

महाराष्ट्रात आणखी एक वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दीड वर्षाच्या या वाघाच्या मृत्यु सोबतच एकोणीस दिवसांत महाराष्ट्रात नऊ वाघांचा मृत्यू झाला आहे.  वाघांचे हे मृत्यू विदर्भात झाले आहेत. 

Jan 21, 2025 07:27 (IST)

Live Update : भंडाऱ्यात हत्तीरोगाने पसरले पाय..

भंडारा जिल्ह्यातील लाखनी, मोहाडी आणि तुमसर या तीन तालुक्यात हत्तीरोगाने पाय पसरले आहेत. या दृष्टिकोनातून जिल्हा हिवताप विभागामार्फत विशेष औषध उपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. माहितीनुसार, या तिन्ही तालुक्यातील 5 लाख 8 हजार 403 लोकसंख्येस हत्तीरोग दुरीकरणाकरिता सार्वत्रिक औषध उपचारांच्या डोस दिला जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे.