Central Railway : बदलापूर-वांगणीदरम्यान रेल्वे रुळाला तडे, कर्जतपर्यंत जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचे हाल

आज सकाळी नोकरदारवर्ग कामावर जायला निघाला असताना मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Badlapur News : मध्य रेल्वेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज सकाळी नोकरदारवर्ग कामावर जायला निघाला असताना मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प होती, अशी माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील बदलापूर-वांगणीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे कर्जतपर्यंतची वाहतूक ठप्प होती.  

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर आणि वांगणी दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण ते कर्जत दरम्यान जवळपास दीड तास डाऊन लाईनवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. 

नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा! वाचा सर्व माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 6:40 वाजता बदलापूर ते वांगणी स्टेशन दरम्यान डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे डाऊन लाईन पूर्णपणे बंद झाली होती. वांगणी रेल्वे स्टेशन ड्युटीवर असलेले अंमलदार पोलीस शिपाई कदम यांनीही याबाबत माहिती दिली. 

Advertisement

Topics mentioned in this article