जाहिरात

Baramati News: खळबळजनक! सुनेत्रा पवारांना रोखण्यासाठी बोगस सह्यांचा खेळ; तब्बल 22 उमेदवारांवर कारवाई होणार?

सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभे राहणाऱ्या २२ उमेदवारांच्या अर्जावरील सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Baramati News: खळबळजनक! सुनेत्रा पवारांना रोखण्यासाठी  बोगस सह्यांचा खेळ; तब्बल 22 उमेदवारांवर कारवाई होणार?

Baramati Assembly Bypoll Election News:  बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत नवव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी ७८५२८ मतांची भक्कम आघाडी घेत विजयाचा मार्ग सुकर केला आहे. मात्र, एकीकडे गुलाल उधळण्याची तयारी सुरू असतानाच या निवडणुकीत 'बोगस सह्यांचा' मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभे राहणाऱ्या २२ उमेदवारांच्या अर्जावरील सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उमेदवारी अर्ज दाखल करताना नियमानुसार आवश्यक असलेल्या सह्यांमध्ये फेरफार करण्यात आला आहे. प्रशासकीय तपासणीत अनेकांच्या सह्या बोगस असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया विश्वसनीय सूत्रांनुसार सुरू करण्यात येणार आहे. सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित मानला जात असताना या कायदेशीर पेचामुळे बारामतीचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Baramati- Rahuri Election Result LIVE: सुनेत्रा पवारांची विक्रमी विजयाकडे वाटचाल! बारामतीकरांना मोठे आवाहन

विक्रमी विजयाआधी सुनेत्रा पवार यांचा सर्वात मोठा निर्णय 

"आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत," असं म्हणत मोठ्या विजयाआधी सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. 

"दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची," असं त्या म्हणाल्यात. 

Humayun Kabir: बाबरी मस्जिदसाठी ममतांसोबत पंगा घेणारे हुमायूं कबीर जिंकले की हरले? नाओदात टक्कर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com