Baramati Assembly Bypoll Election Result 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत बारामतीकरांनी स्वर्गीय अजित पवार यांना मतपेटीतून आदरांजली वाहताना सुनेत्रा पवार यांना दोन लाख, 18 हजार मतांहून अधिक लीड देत भरघोस मतांनी विजयी केले. सुनेत्रा पवार यांनी २३ उमेदवारांचा सुफडा साफ करत एकतर्फी आघाडी घेत लाखोंच्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांनी अजित पवार यांचे मोठ्या मताधिक्क्याचे रेकॉर्डही मोडित काढले.
बारामतीकरांची दादांना श्रद्धांजली; सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय मिळवत बारामतीवर आपली पकड सिद्ध केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी १ लाख ३२ हजार ९१६ मतांचे मताधिक्य घेत विरोधकांना चारीमुंड्या चित केले. विशेष म्हणजे, अजित दादांनी २०२४ मध्ये नोंदवलेला १ लाख १ हजारांच्या मताधिक्याचा विक्रमही सुनेत्रा पवार यांनी मागे टाकला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्डही मोडला आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 24 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना दोन लाख 18 हजार 930 इतकी मतं पडली. उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडला आहे. 2022 च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना दोन लाख 14 हजार 835 मते मिळाली होती. आता 24 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना बारामती पोट निवडणुकीत दोन लाख 18 हजार 930 मते मिळाली आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात २३ उमेदवार असले तरी बारामतीकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबाच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली. पंधराव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली ही आघाडी एकतर्फी विजयाकडे नेणारी ठरली. तेराव्या आणि पंधराव्या फेरीत मिळालेल्या भरघोस मतांमुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हा विजय साजरा केला. दादांच्या आठवणींना उजाळा देत असतानाच, बारामतीचा विकास पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे, अशी भावना मतदारांनी व्यक्त केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world