2 months ago

Malegaon Sugar Factory Election Result Vote Counting Live Updates: माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. त्यानंतर  आज (24 जून)  प्रत्यक्षात मतमोजणी होणार असून माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी ठरणार आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असलं तरी तावरे गटाने सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांना कडवं आव्हान दिले आहे. 

Jun 25, 2025 07:50 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: अजित पवार गटाची विजयाकडे वाटचाल, किती जागांवर आघाडी?

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे अद्याप देखील ही मतमोजणी सुरूच आहे. आता तब्बल या मतमोजणीला 22 तास ओलांडले आहेत. विशेष म्हणजे पहिली फेरीचे मतमोजणीची प्रक्रिया ही जवळपास पहाटे चार ते साडेचार च्या सुमारास संपली.आतापर्यंत केवळ एकच निकाल घोषित झाला असून त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. 

मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर बऱ्यापैकी अजित पवार गटाची म्हणजे श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.

Jun 24, 2025 22:15 (IST)

ऊस उत्पादक गटामध्ये अजित पवार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गट क्रमांक  माळेगाव आणि पणदरे सर्वसाधारण ऊस उत्पादक गटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर..

माळेगाव पहिली फेरी निहाय....मोजलेली मते 8517

नीलकंठेश्वर पॅनल

बाळासाहेब तावरे : 3880

शिवराज जाधवराव : 4380

राजेंद्र बुरुंगले: 3754

सहकार बचाव शेतकरी पॅनल

रंजन कुमार तावरे : 3614

संग्राम काटे : 3446

रमेश गोफणे : 3003

गट पणदरे..

श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार

 

तानाजी कोकरे ८६९

योगेश जगताप ९९२

स्वप्नील जगताप ९३८

सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार

रोहन कोकरे ७५४

रणजीत जगताप ७३९

सत्यजीत जगताप ७९८

Jun 24, 2025 19:12 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates तावरे गटाला मोठा धक्का, रंजनकुमार तावरे पिछाडीवर

तावरे गटाला मोठा धक्का, रंजनकुमार तावरे पिछाडीवर 

माळेगाव गटातला  9257  मते मोजली गेली आहेत. त्यात  1692 मते शिवराज जाधवराव यांना मिळाली आहेत. तर  1548 मतं ही बाळासाहेब तावरे यांना मिळाली आहे.  1517 मते राजेंद्र बुरुगले यांना मिळाली आहे.  

Jun 24, 2025 19:07 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result ajit pawar won against bhalchandra devkate

Malegaon Cooperative Sugar Factory election results: या साखर कारखान्याची निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे.

Advertisement
Jun 24, 2025 18:12 (IST)

माळेगाव साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आतापर्यंत काय काय घडलं?

ब वर्ग प्रतिनिधी म्हणून अजित पवार विजयी, 91 मतांनी अजित पवार यांचा विजय

अ वर्ग करिता 17296 मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचे 7722 मते मोजून झाली आहेत. यात निळकंठेश्वर पॅनल ला 3926 मते मिळाले आहेत. तर सहकार बचाव पॅनलला 3510 मते मिळाले आहेत.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले  416 मतांनी आघाडीवरती तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड पिछाडीवर आहेत.

तर इतर मागास प्रवर्गाचे 2680 मते मोजून झाली आहेत इतर मागास प्रवर्ग मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे 197 मतांनी आघाडीवर तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पिछाडीवर आहेत.

महिला राखीव प्रवर्ग गटामधून

अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना 731 मते  तर ज्योती मुलमुले यांना 648 मते  मिळाली आहेत.

तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना 713 मते तर सुमन गावडे यांना 551 मते मिळाली आहेत.

महिला गटातून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत.

महिला प्रवर्गामध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे दिसत आहे

माळेगाव सहकारी साखर कारखाना मतमोजणी प्रक्रियेमध्ये आलेल्या माहिती नुसार अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे भटक्या विमुक्त प्रवर्गामधून विलास ऋषिकांत देवकाते यांनी 781 मताची आघाडी घेतली आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार यात अजित पवार गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहे.

तर तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे एक महिला उमेदवार आघाडीवर आहे.

Jun 24, 2025 16:55 (IST)

माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का

माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.  बळीराजा पॅनलच्या उमेदवाराला 7,722 पैकी फक्त 251 मतं मिळाली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 7,722 मतदानापैकी शरद पवारांच्या उमेदवाराला फक्त 251 मतं मिळाली आहेत.

Advertisement
Jun 24, 2025 16:35 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: महिला राखीव प्रवर्ग गटामधून ही अजित पवारांचे पॅनल आघाडीवर

अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना 731 मते  तर ज्योती मुलमुले यांना 648 मते  मिळाली आहेत.तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना 713 मते तर सुमन गावडे यांना 551 मते मिळाली आहेत.महिला गटातून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत.

Jun 24, 2025 16:17 (IST)

माळेगाव साखर कारखाना निवडणूक: निकाल आमच्याच पॅनलच्या बाजूने लागणार - चंद्रहार तावरेंना आत्मविश्वास

माळेगाव साखर कारखाना निवडणूक: निकाल आमच्याच पॅनलच्या बाजूने लागणार - चंद्रहार तावरेंना आत्मविश्वास

Advertisement
Jun 24, 2025 16:16 (IST)

माळेगाव साखर कारखाना निवडणूक| पवार की तावरे? पत्रकारांचा अंदाज काय सांगतो?

माळेगाव साखर कारखाना निवडणूक| पवार की तावरे? पत्रकारांचा अंदाज काय सांगतो? पाहा Ground Report

Jun 24, 2025 15:53 (IST)

Malegaon Sugar factory election result Sharad Pawar reaction on Ajit Pawar role

Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवर शरद पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 24, 2025 15:30 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: नीलकंठेश्वर पॅनल मिळालेली एकूण मते 3926 एकूण 416 लीड

अनुसूचित जाती जमाती

7722 पैकी 

नीलकंठेश्वर पॅनल मिळालेली एकूण मते 3926 एकूण 416 लीड...

- सहकार बचाव पॅनल _ किटली 3510

- तुतारी - 251

- कुकर - 26

- पतंग - 9

Jun 24, 2025 15:29 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: इतर मागास प्रवर्गातही अजित पवारांच्या पॅनलची आघाडी

तर इतर मागास प्रवर्गाचे 2680 मते मोजून झाली आहेत इतर मागास प्रवर्ग मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे 197 मतांनी आघाडीवर तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पिछाडीवर

Jun 24, 2025 15:24 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड पिछाडीवर

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचे 7722मते मोजून झाली आहेत. यात निळकंठेश्वर पॅनल ला 3926 मते मिळाले आहेत. तर सहकार बचाव पॅनलला 3510 मते मिळाले आहेत.अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले  416 मतांनी आघाडीवरती तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड पिछाडीवर आहेत.

Jun 24, 2025 14:58 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल आघाडीवर

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल आघाडीवर

* आतापर्यंत अनुसूचित जाती जमातीमधील 6820 मते मोजली

* अनुसूचित जाती जमातीमध्ये अजित पवारांच्या पॅनलला 3440 मते तावरे गटाला 3094 मते 

* अजित पवार गटाचे रतन कुमार भोसले 376 मतांनी आघाडीवर

इतर मागास प्रवर्गात अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर पॅनलची आघाडी

* इतर मागास प्रवर्गात अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल आघाडीवर....

* आतापर्यंत इतर मागास प्रवर्गातील 1800 मते मोजली....

* इतर मागास प्रवर्गातून अजित पवार गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनल 262 मतांनी आघाडीवर....

* अजित पवार गटाचे नितीन शेंडे 262 मतांनी आघाडीवर....

Jun 24, 2025 14:41 (IST)

Malegaon Sakhar karkhana Election Result who will be next chairman know result

मालेगाव साखर कारखाना निवडणूकीतील पहिला निकाल समोर आला आहे. ब वर्गातून अजित पवार हे विजयी झाल्याची माहिती आहे.

Jun 24, 2025 14:34 (IST)

Baramati Malegaon Sugar Factory Election Result From B Class Group DCM Ajit Pawar Won 91 Votes received

Baramati Malegaon Sugar Factory Election Result: lतावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मधून भालचंद्र देवकाते उमेदवार होते. 101 मतांपैकी अजित पवारांना 91 मते मिळाली तर देवकाते यांना अवघी 10 मते मिळाली. 

Jun 24, 2025 14:33 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: तावरे जगताप एकत्र आल्याने वेगळीच चर्चा

माळेगाव साखर कारखाना मतमोजणीच्या दिवशी रंजनकुमार तावरे आणि केशवराव जगताप एकत्र आले होते. त्यामुळे एक वेगळीच राजकीय चर्चा मतमोजणी केंद्रावर रंगली होती. 

Jun 24, 2025 12:47 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: कट्टर विरोधक एकत्र, माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संस्कृतीचे दर्शन

बारामतीमध्ये आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी पार पडत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री निळकंठेश्वर पॅनल निवडणुकीत उतरलेल आहे तर अजित पवार गटाच्या विरोधात माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात आहे. 

मात्र याच दरम्यान अजित पवार गटाच्या पॅनलचे प्रचार प्रमुख माळेगाव कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष केशव जगताप आणि तावरे गटाचे पॅनल प्रमुख माझे अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांची गाळभेट झालीये.

Jun 24, 2025 12:44 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले आघाडीवर

माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक 

अजित पवार गटाचे नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले आघाडीवर 

तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर 

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर

Jun 24, 2025 12:11 (IST)

Rahul Gandhi Tweet: फडणवीसांच्या मतदारसंघात मोठी मतदार वाढ, राहुल गांधींचे आरोप

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदार यादीत 5 महिन्यात 8 टक्के वाढ झाली, काही बूथवर 20 ते 50 टक्क्यांनी मतदारवाढ झाली असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. यावर निवडणूक आयोगाचे मौन का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

Jun 24, 2025 12:04 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live Updates: अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले आघाडीवर

माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक 

अजित पवार गटाचे नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले आघाडीवर 

तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर 

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर

Jun 24, 2025 12:01 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव कारखाना निवडणुकीत क्रॉस वोटिंग, पॅनेल टू पॅनेल मतदान नाही

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी आज सुरु आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचं समोर आले आहे. या निवडणुकीत कुठेही पॅनेल टू पॅनेल मतदान झालेले नाही

Jun 24, 2025 11:59 (IST)

Pune News: माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

 दुपारी चार वाजता मुंबईत पक्ष प्रवेशाच आयोजन

अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेश

पुण्यात ठाकरे गटाला अजित पवारांचा धक्का

महादेव बाबर यांच्यासह पुणे शहरातील इतर 3 नगरसेवक देखील आज करणार पक्ष प्रवेश 

Jun 24, 2025 11:57 (IST)

Malegaon Sugar Factory Election: एक जागा आली म्हणजे सर्व पॅनल नाही: रंजनकुमार तावरे

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सकाळी नऊ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली यावेळी ब प्रवर्गातील मतमोजणी अगोदर त्या ठिकाणी पार पडली. यामध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलचे ब वर्गाचे उमेदवार अजित पवार यांना तब्बल 91 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणारे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाली. यात अजित पवारांचा 91 मतांनी विजय झाला..

Jun 24, 2025 10:50 (IST)

LIVE Updates: मनसेच्या केंद्रीय समितीची आज शेवटची बैठक

मनसेच्या केंद्रीय समितीची आज शेवटची बैठक

बैठकीत दक्षिण मुंबईच्या मनसेच्या स्थितीचा घेतला जाणार आढावा

मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि केंद्रीय समितीचे सर्व नेते बैठकीत उपस्थित

दक्षिण मुंबईतील मनसेच्या एकूण पदाधिकारी सद्यस्थिती आणि मतदारसंघाचा घेतला जाणारा आढावा

कोणती पदे रिक्त आहेत या संदर्भात आढावा घेऊन ती पदे भरली जाणार

एकूणच सर्व अहवाल आज राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला जाणार

गेल्या आठवड्याभरापासून सुरू होती मनसेची केंद्रीय समितीची बैठक

Jun 24, 2025 10:04 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live Updates: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार विजयी

मालेगाव साखर कारखाना निवडणूकीतील पहिला निकाल समोर आला आहे. ब वर्गातून अजित पवार हे विजयी झालेत. अजित  पवार यांना 91 मते मिळाली असून भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मते मिळाली आहेत. 

Jun 24, 2025 09:58 (IST)

Malegaon Sugar Factory Election Live Updates: माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवारांचा झेंडा

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक  ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर....

माळेगाव  सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संस्था प्रतिनिधी ब प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवीत आहेत यामध्ये ते आघाडीवर आहेत...

अजित पवार यांच्या विरोधात तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मधून भालचंद्र देवकाते उमेदवार आहेत.....

Jun 24, 2025 09:27 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात

* बारामती मधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात....

* ब वर्गातील मतमोजणी ला झाली सुरुवात. 

* 102 मतदारांपैकी 101 मतदारांनी बजावला होता हक्क....

* ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघाचा थोड्याच वेळात निकाल येणार हाती.

* दोन फेऱ्यात होणार मतमोजणीची प्रक्रिया 

* एकूण चौथी मतमोजणी सुरू

Jun 24, 2025 09:09 (IST)

Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाववर कोणाची सत्ता? थोड्याच वेळात निकाल

माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहा गटात ८८.४८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार असलेले 'ब' वर्ग सभासद संस्था मतदारसंघात १०२ मतदार आहेत. त्यातील १०१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

माळेगाव कारखान्याच्या पाचही गटांत पुरुषांबरोबर महिलांच्या रांगा, गर्दी मतदानासाठी लागल्याचे चित्र दिसून आले.  बारामती, पणदरे, सांगवी, नीरावागज आणि माळेगाव या गटांत विक्रमी मतदान झाले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण १९ हजार ५४९ मतदार आहेत. त्यापैकी १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १२ हजार ८६२ पुरुषांनी तर चार हजार ४३४ महिलांचा समावेश आहे.

मतदानाच्या टक्केवारीवरून बहुतेक सर्व गटांत चुरशीच्या लढती झाल्याचे दिसून आले.  सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.

Jun 24, 2025 09:08 (IST)

LIVE Updates: अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला! शरद पवार, तावरेंचे आव्हान

आतापर्यंत बारामतीतून अजित पवारांचा किल्ला अभेद्य राहिलाय, तरी देखील अजित पवारांना माळेगाव जिंकण्यासाठी बारामतीत ठाण मांडावं लागलं. एक दोन हवे तर तब्बल बारा जाहीर सभा अजित पवारांना घ्याव्या लागल्या आणि त्याच कारण आहे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी अजित पवारांसमोर उभा केलेलं कडवं आव्हान.

सुरुवातीला अजित पवार शरद पवार गटाला काही जागा देतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित ही निवडणूक लढवतील असं चित्र होतं.मात्र 13 जून रोजी अजित पवारांनी शरद पवार गटाला एकही जागा न देता श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली त्यामुळे आपसूकच शरद पवार गटाला बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं लागलं. मात्र शरद पवार गटाने अजित पवारांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. दुसरीकडे कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून दशरथ राऊत यांच्या नेतृत्वात कष्टकरी शेतकरी पॅनलने ही आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत.

Jun 24, 2025 09:07 (IST)

LIVE Updates: माळेगाव कारखान्याचा आज निकाल, अजित पवारांसमोर कडवे आव्हान

माळेगाव सहकारी साखर कारखाना ही बारामतीच्या राजकारणातील महत्त्वाची संस्था आहे. तब्बल 37 गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे 19000 हून अधिक शेतकरी सभासद आहेत. मागील पाच वर्षाच्या कालखंडात या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळ काम करत होता. आता मात्र स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असलं तरी तावरे गटाने सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांना कडवं आव्हान दिले आहे.