DCM Ajit Pawar Last Rites News: 'अजित पवार अमर रहे, आमचा वाघ गेला, बारामतीचा बाप गेला...' अशाच घोषणा आज बारामती शहरामध्ये घुमताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून बारामतीमध्ये लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे. आमचा दादा आम्हाला पोरका करुन गेला, अशीच भावना महाराष्ट्रातला प्रत्येक जण व्यक्त करत आहे.
अजित दादा निघाले अनंताच्या प्रवासाला..
आज सकाळी अजित पवार यांचे पार्थिव बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. होते. यावेळी अजित पवार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी लोटल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीमुळे पवार बंगल्याचे गेटही लागत नव्हते. 10- 12 पोलीस गेट लावण्याचा प्रयत्न करत होते. आमदार रोहित पवार हे वारंवार समुदायाला शांततेचे आवाहन करत होते.
Ajit Pawar: कामाचा माणूस हरपला! महाराष्ट्राच्या हिताचे अजित पवार यांनी घेतलेले 10 मोठे निर्णय
काटेवाडीमधील अंत्यदर्शनानंतर अजित पवार यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. शववाहिकेतून अजित पवारांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या रथात ठेवण्यात आले आहे. पवार कुटुंबीय , नातेवाईक आणि मोजक्या कार्यकर्त्यांसह अजित पवारांचे पार्थिव रथातून काटेवाडी येथून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानकडे निघाले आहे. रथाच्या पाठीमागे लाखोंचा जनसमुदाय लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी धावत आहे. अजित पवार अमर रहे, दादा परत या असे म्हणत प्रत्येक कार्यकर्ता आक्रोश करताना दिसत आहे.
बारामतीत अलोट गर्दी, मार्ग बदलला
बारामती शहरात अलोट गर्दी झाल्याने या अंत्ययात्रेचा मार्गही बदलण्यात आला आहे. गर्दी नियंत्रणा बाहेर जात असल्याने अंत्ययात्रा बारामती शहरातून न निघता अजित पवारांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानकडे ठेवण्यात आले. बारामती शहरात तुरळक प्रमाणात रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. इतर सर्व दुकाने व्यापार हा आज संपूर्ण शहरात बंद असल्याचे चित्र दिसत आहे.नागरिक रस्त्याच्या कडेला बसून घडलेल्या घटनेची चर्चा हे ठिकठिकाणी करताना दिसताहेत..अजित पवार यांचा अंत्यविधी होईपर्यंत बारामती मध्ये संपूर्ण व्यवहार हे बंदच राहणार आहेत.