DCM Ajit Pawar last Rites Sharad Pawar Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने बारामतीकरांसह, संपूर्ण महाराष्ट्र अन् पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. लाडक्या पुतण्याच्या अकाली एक्झिटने शरद पवार यांच्यावरही मोठा आघात झाला असून अजित पवार यांच्या अंत्यदर्शनावेळी त्यांच्या भावमुद्रेने सर्वांनाच भावुक केले.
Ajit Pawar: अजित पवार निघाले अनंताच्या प्रवासाला! लाडक्या बहिणींचा आक्रोश; महिलेला भोवळ आली
लाडका पुतण्या गेला, काका गहिवरले
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून बाळकडू घेतलेला लाडका पुतण्या अजित पवार यांचे निधन म्हणजे शरद पवार यांच्यावर मोठा आघात आहे. शरद पवार यांनी अजित पवारांची राजकीय कारकीर्द फुलवली, नवनवे डावपेच आखत राज्याच्या राजकारणात खंबीर नेतृत्व म्हणून लाडक्या पुतण्याला पुढे आणलं. शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते, त्यांच्या अकाली निधनाने शरद पवारांचा आधाराचा खांदा हरवल्याची भावना आज प्रत्येक जण व्यक्त करत आहे.
हात जोडले, डोळे मिटले...!
अजित पवार यांच्या अंत्यदर्शनावेळी शरद पवार एका खुर्चीत शांतपणे बसून येते. डोळ्यातले अश्रु आवरत येणाऱ्यांना नमस्कार करत बसण्याची विनंती करत होते. शरद पवारांनी डोळे मिटत, हात जोडत अजित पवार यांना मनोमन निरोपही दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात तेल लावणारा पैलवान म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या या दुःखाने समोर असलेला जनसमुदायही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
Ajit Pawar: कामाचा माणूस हरपला! महाराष्ट्राच्या हिताचे अजित पवार यांनी घेतलेले 10 मोठे निर्णय