Basic Military Training : इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण; शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून देशभक्ती, शिस्त रुजवण्यासाठी आणि नियमित शारिरीक व्यायामाची सवय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

महाराष्ट्राच्या भाजप सरकारने राज्यात विद्यार्थ्यांनी बेसिक मिलेट्री ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना बेसिक मिलेट्री प्रशिक्षण दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून देशभक्ती, शिस्त रुजवण्यासाठी आणि नियमित शारिरीक व्यायामाची सवय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवृत्त सैनिकांना आणलं जाणार आहे.  

Advertisement

नक्की वाचा - छत्रपती संभाजीनगरमध्ये कामगार रुग्णालयासाठी 6 हेक्टर जमीन, राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

राज्यातील पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता सैनिकी शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अडीच लाख माजी सैनिकांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.