Beed News : बीडमध्ये रेल्वे धावणार! मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी बीड-अहिल्यानगर मार्गाचा शुभारंभ

Beed-Ahilyanagar Railway : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून, येत्या 17 सप्टेंबर रोजी बीड शहर रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

Beed-Ahilyanagar Railway : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून, येत्या 17 सप्टेंबर रोजी बीड शहर रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, बीड ते अहिल्यानगर (अहमदनगर) या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून बीडवासियांची असलेली रेल्वेची प्रतीक्षा यामुळे आता संपुष्टात येणार आहे.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत, अजित पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ या उर्वरित रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या कामातील सर्व अडथळे दूर करून ते गतीने पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवारांनी काय घोषणा केली?

अजित पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश बीड जिल्हा प्रशासनाला दिले. त्यांनी राज्याच्या हिश्श्याची रक्कम त्वरित अदा करावी, असेही सांगितले.

अर्थसंकल्पात मंजूर झालेले 150 कोटी रुपये तात्काळ वितरित करावेत.

उर्वरित 150 कोटी रुपयांची तरतूद करावी.

रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र (Utility Certificate) सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

या बैठकीत रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, वित्त आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त, बीड जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही सहभाग घेतला.

Advertisement

( नक्की वाचा : Maratha reservation : 'कुणबी' दाखल्यासाठी अर्ज कसा कराल? वाचा सरकारी GR मधील संपूर्ण माहिती, सोप्या शब्दात! )
 

कसा आहे रेल्वे मार्ग?

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261.25 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1,822.168 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

एकूण पूल: 130 (रेल्वेखालील), 65 (रेल्वेवरील).

मोठे पूल: 65

छोटे पूल: 302

या प्रकल्पाची द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार एकूण किंमत 4,805.17 कोटी रुपये आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के हिस्सा (प्रत्येकी 2,402.59 कोटी रुपये) उचलणार आहेत.

याच बैठकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण ते लोणंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यास आणि बारामती रेल्वे स्थानकाचे काम गतीने करून ते लवकरच प्रवाशांसाठी सुसज्ज करण्याचे निर्देशही दिले.

Advertisement
Topics mentioned in this article