आकाश सावंत, बीड:
Beed News: वंशाला दिवा पाहिजे म्हणून विवाहितांचा छळ, मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलांनी मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घडना उघडकीस येत आहेत. अशीच धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. तीन मुली झाल्या म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरु होता, या छळाला कंटाळून २४ वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या म्हाळसापूरमध्ये सासरच्या छळाने एका विवाहितेचा जीव घेतल्याची हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आलीय. अवघ्या 24 वर्षांच्या भक्ती कोरडे हिने विष प्राशन करून आयुष्य संपवले. तीन मुली झाल्या म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून पती, सासू आणि सासऱ्यांकडून तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा आरोप आहे.
Satara News: सहावीच्या विद्यार्थिनींनी दहावीचे पेपर तपासले? साताऱ्यातील धक्कादायक प्रकार
नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी संमती दे, असा दबाव टाकत मारहाणही केली जात असल्याचे समोर आले आहे. अखेर या अमानुष छळाला कंटाळून भक्तीने विष पिऊन टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.