जाहिरात

Satara News: सहावीच्या विद्यार्थिनींनी दहावीचे पेपर तपासले? CCTV समोर, साताऱ्यात खळबळ

शिक्षक विद्यार्थिनींसोबत बसून उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या गंभीर प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Satara News: सहावीच्या  विद्यार्थिनींनी दहावीचे पेपर तपासले? CCTV समोर,  साताऱ्यात खळबळ

राहुल तपासे, सातारा:

Phaltan 10th Paper Checking Controversy:  इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचे गंभीर प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहावीचा बोर्ड परीक्षेचा पेपर चक्क सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील विडणी येथील शाळेमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे, ज्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. 

सहावीच्या विद्यार्थिनींकडून १० वीची पेपर तपासणी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे महत्त्वाचे पेपर चक्क सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. 

Mumbai Crime: "मेहता सुधर जा.." मुंबईत प्रसिद्ध बिल्डरला छोटा शकिलच्या नावाने धमकी, जिवंत काडतुसही पाठवलं

शाळेतील एका शिक्षकाने दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासताना सहावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींना मदतीला बसवले, असा आरोप केला जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याची चर्चा असून त्यामध्ये शिक्षक विद्यार्थिनींसोबत बसून उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या गंभीर प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

कठोर कारवाईची मागणी 

दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अशा परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतच निष्काळजीपणा झाल्याचा आरोप समोर आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणाबाबत शाळा प्रशासनाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता या गंभीर प्रकारावर शिक्षण विभाग नेमकी काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dharashiv News: धाराशिवच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! ZP अध्यक्षपदावरही शिवसेनेचा दावा, भाजपचं टेन्शन वाढलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com