Beed Crime: खळबळजनक! पुतण्याचा हल्ला, चुलत्याचं बोट तुटून पडलं; बीडमध्ये भयंकर घडलं

ही भयंकर घटना बीड तालुक्यातील रुई शहाजानपूर गावात घडली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार दर्शविणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड:

Beed Crime: बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  शेतीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकावर तलवारीचा वार करत हाताचे बोट छाटले आहे. तर पुतण्याने चुलत भावावर देखील तलवारीनेच गंभीर हल्ला केला आहे. ही भयंकर घटना बीड तालुक्यातील रुई शहाजानपूर गावात घडली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार दर्शविणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Mumbai Rain: मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस! अंधेरी सब वे पाण्याखाली; वाहतुकीचा खोळंबा, कुठे काय स्थिती? वाचा..

बीडमध्ये पुतण्याचा चुलत्यावर हल्ला 

समोर आलेल्या माहितीनुसार, रामू सोपान घुमरे यांची रुई शहाजानपूर या गावात चार एकर शेती आहे. याच शेतीच्या विक्रीवरून घुमरे कुटुंबाचे भावकीत सतत वाद होत होते. हा वाद इतक्या टोकाला गेला की पुतण्या अतुल घुमरेने चुलते रामू घुमरे यांचे तलवारीने बोट छाटले. तर चुलत भाऊ बाळासाहेब घुमरे याच्यावर देखील तलवारीने हल्ला चढवला.

Advertisement

घटनेनंतर दोघांना जिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हल्ल्याची गंभीरता लक्षात घेता त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. आठवडाभर उपचार झाल्यानंतर दोघे घरी परतले आहेत. 24 जून रोजी घडलेल्या या घटनेत आधी जखमींवर छत्रपती संभाजीनगर इथे उपचार झाले.

त्यानंतर रात्री उशिरा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपींना अटक नाही. त्यामुळे आरोपीना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबाची आहे.

Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात अलर्ट! कोकणातही तुफान पाऊस बरसणार; हवामान विभागाचा मोठा इशारा

Topics mentioned in this article