Beed Crime News : बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांची निघृण हत्या

Beed News : अजय भोसले (30 वर्ष) आणि भरत भोसले (32 वर्ष) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.  

जाहिरात
Read Time: 1 min

स्वानंद पाटील, बीड

बीडमधील वाढलेली गुन्हेगारी सध्या चर्चेचा विषय आहे. बीडमधील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन सपशेल फेल झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यातच बीड पुन्हा दुहेरी हत्येनं हादरलं आहे. दोन सख्ख्या भावांचा हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात ही घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजय भोसले (30 वर्ष) आणि भरत भोसले (32 वर्ष) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.  नातेवाईकानेच दोघांची हत्या झाल्याची माहिती मिळत आहेत. अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकांसोबत जुना वाद होता. याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांच्या हत्या झाली.

(नक्की वाचा- Baramati Crime : अंत्यविधीची तयारी थांबली, 9 वर्षांच्या पीयुषच्या शवविच्छेदनानंतर बापाचं घृणास्पद कृत्य समोर )

दोघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे आहेत. याच गावापासून 5 किलोमीटर अंतरावर वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Topics mentioned in this article