Beed News : शेतकरी आर्थिक संकटात, खरबुजाचे भाव घसरले; किंमत 23 वरून थेट 12 रुपयांवर..

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं खरबूज शेतकऱ्यांसाठी मोठं संकट घेऊन आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Muskmelon price drops :  खरबुजाच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी 23 रूपये किलो असलेला भाव आज 12 रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. शेतकऱ्यांना खरबुज लागवडीवर झालेला खर्च वसूल करणं अवघड झालं आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उन्हाळ्यात थंडावा देणारं फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरबुजाची लागवड जानेवारीत झाली होती आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून काढणी सुरू झाली आहे. रमजान महिना डोळ्यासमोर ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरबुजाची लागवड केली होती. परंतु मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भावावर नकारात्मक परीणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कुंदन जातीच्या खरबुजाला विशेष मागणी असली तरी रॉयल आणि विजय या जातीचे खरबुजही विक्रीसाठी बाजारात आले आहेत.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Buldhana heat stroke : 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती

तर याच खरबुजाची लागवड बीडच्या मसेवाडी येथील शेतकरी दत्ता मोरे केली होती. त्यांनी तीन एकर कुंदन वाणाच्या खरबुजाची लागवड केली. महिनाभरापूर्वी दीड एकर खरबूजाची विक्री करण्यात आली. तेव्हा 23 रुपये किलो भाव मिळाला. मात्र त्यानंतर ऐन रमजानच्या शेवटच्या आठवड्यात निम्म्याने भाव कोसळले. कडक उन्हाळ्यात शेततळ्याचे पाणी देऊन, कष्टाने पिकविलेल्या खरबुज उत्पादनाचा खर्च सुद्धा निघणं अवघड झालंय. आम्ही घरातील पाच माणसं रानात राबणारे, खरबुज काढण्यासाठी 300 रूपये मजुरी देऊन मजूर आणले होते. आता खरबुजाचे भाव कोसळल्याने शेती कशी परवडणार अशी खंत शेतकरी दत्ता मोरे यांनी बोलून दाखवली.
 

Advertisement