Beed News: मुक्ताईच्या वारकऱ्यांची सेवा करणारी 325 वर्षांची निजामकालीन परंपरा काय? पाचवी पिढी आज ही कार्यरत

तांब्याच्या भांड्यात शिजवलेल्या वरणाची लज्जतदार चव या पाच पिढ्यांच्या परंपरेची साक्ष देते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये भक्तीभावाने स्वागत झाले असून तब्बल तीनशे पन्नास वर्षांची परंपरा जपली जाते
  • स्वातंत्र्यपूर्व काळात खरेदी केलेल्या तांब्याच्या आणि पितळी भांड्यांत वारकऱ्यांसाठी महाप्रसाद तयार केला जातो
  • बीडकरांनी पंच मंडळाद्वारे वारकऱ्यांची सेवा केली जात आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बीड:

आकाश सावंत 

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचे बीडमध्ये मोठ्या भक्तीभावात स्वागत करण्यात आले. संत मुक्ताई आणि बीडकरांचे एक अतूट नाते आहे. तब्बल 325 वर्षांची निजामकालीन परंपरा आजही जोपासली जात आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात 'शके 1852' मध्ये खरेदी केलेल्या ऐतिहासिक तांब्याच्या आणि पितळी भांड्यांमध्ये महाप्रसाद केला जातो. वारकऱ्यांसाठी हा महाप्रसाद बनविण्याची परंपरा बीडकरांच्या पाचव्या पिढीने कायम ठेवली आहे.

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुक्ताईंची पालखी बीडमध्ये विसावली होती. 'साधू संत येती घरा... तोची दिवाळी दसरा' या भावनेतून बीडकरांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये 'मराठा पंच मंडळ' कार्यरत होते. या मंडळाने मुक्ताईच्या पालखीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी खास तांब्याची आणि पितळी भांडी खरेदी केली होती. त्यात बकेट, कढया, पातेले यांचा समावेश होता.या भांड्यांवर आजही शके 1828 च्या नोंदी आढळतात. पंचांचा तो जुना दगडी वाडा आजही 'पंचाचा वाडा' म्हणून प्रसिद्ध आहे.

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: माऊलींच्या पालखी सोहळ्यात अजितदादांची एन्ट्री! एकच वादाची घोषणा अन् सेल्फीसाठी गर्दी, प्रकार काय

रविवारी सकाळी या ऐतिहासिक भांड्यांमध्ये वारकऱ्यांसाठी वरण, चपाती आणि भात असा खास महाप्रसादाचा बेत करण्यात आला होता. तांब्याच्या भांड्यात शिजवलेल्या वरणाची लज्जतदार चव या पाच पिढ्यांच्या परंपरेची साक्ष देते. महाप्रसादासाठी पंचाच्या वाड्यातील दोन खोल्यांच्या भाड्यातून येणारी रक्कम आणि कबाडगल्ली, माळीवेस परिसरातील रहिवासी लोकवर्गणी गोळा करून या भोजनाचे नियोजन करतात. 

नक्की वाचा - Wari Special: वय वर्ष 81, सलग 41 वर्ष पायी वारी! आता ही तोच जोष, तोच उत्साह, वारकऱ्याची थक्क करणारी कहाणी

मूळ पंच मंडळात शामराव जाधव, माधवराव पवार, रामकिसन जाधव, काशीराम शिंदे आणि विश्वनाथ जाधव यांचा समावेश होता. हे जुने जाणते आता हयात नसले तरी, कबाडगल्लीतील संतोष जाधव यांच्यासह त्यांचे वारसदार हा वारकरी सेवेचा वसा अत्यंत निष्ठेने चालवत आहेत. दोन दिवसांच्या विसाव्यानंतर आणि वारकऱ्यांच्या सेवेनंतर, सोमवारी सकाळी आजोबा गोविंदपंत यांच्या भेटीनंतर मुक्ताईंची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. बीडकरांच्या या अनोख्या पाहुणचाराची आणि ऐतिहासिक परंपरेची वारीत आवर्जून चर्चा होत आहे.