जाहिरात

Manoj Jarange Patil: 'पाय एकीकडे, हात एकीकडे', कराड गँगच्या धमकीनंतर मनोज जरांगेंचं थेट आव्हान

एक ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली ज्यामध्ये मनोज जरांगेंनाही गोळ्या घालण्याचा उल्लेख आहे. या कथित धमकीवर आता मनोज जरांगेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

Manoj Jarange Patil: 'पाय एकीकडे, हात एकीकडे', कराड गँगच्या धमकीनंतर मनोज जरांगेंचं थेट आव्हान

Beed Manoj Jarange Patil News:  बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत पाहायला मिळत आहे. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य आरोपी असलेल्या प्रतिक घुले, सुदर्शन घुले यांनी जेलमध्ये एका कैद्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेलमध्ये घडलेला हा प्रकार सांगतानाची एक ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली ज्यामध्ये मनोज जरांगेंनाही गोळ्या घालण्याचा उल्लेख आहे. या कथित धमकीवर आता मनोज जरांगेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

Delhi News: विखे विरूद्ध कोल्हे! भाजप नेत्यांच्या कारखान्याची सुप्रीम लढाई, एका निवडणुकीने कसा संघर्ष पेटला?

काय आहे धमकीचे प्रकरण? 

बीड जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केल्याचा दावा कारागृहातील एका कैद्याने केला आहे.  याबाबतची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. अजहर अब्द्दल पठाण अस मारहाण झालेल्या बंदीचे नाव असल्याचं कॉल रेकॉर्डिगमध्ये आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, शंकर मधुकर शेप यांनी मला मारहाण केली. माझा हात उखडला आहे. ऊपर हड्डी निकलआयी है असे हा कैदी सांगत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्लॅन शिजला आहे. आधीच्या जेलरची बदली करून आत्ताचा जेलर पण आम्हीच आणला आहे, आमचं इथे कोणीच काही बिघडू शकत नाही, असाही उल्लेख या ऑडियो क्लीपमध्ये आहे. या धमकीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

मनोज जरांगेची प्रतिक्रिया 

"तू गोळ्या घालायला फक्त इथे ये, त्याचे काय दुष्परिणाम असतील हे कळेल. गोळ्या घालायचं लांब राहिलं, तू फक्त मला बघून जा, असं थेट आव्हानचं मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे. आमचा समाजही मोठा आहे, उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणे कशाला म्हणतात हे आणखी एकदा संपूर्ण देश बघेल. आमच्याकडे कुऱ्हाडी आहेत, कोयते आहेत. तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे आणि मुंडकं एकीकडे झालेलं तुला दिसेल, तू मला फक्त गोळ्या घालून दाखवं.." असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. 

Women Cricketer: सेक्सटॉर्शन महागात पडलं! महिला क्रिकेटरला मुंबई पोलिसांचा दणका, तिघांना अटक

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com