Beed News: 'अजित पवार कोत्या मनाचे', शिवराज दिवटेची भेट टाळल्याने मराठा मोर्चाचे समन्वयक संतापले

अजित पवार हे शिवराज दिवटे याची भेट न घेताच ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून निघून गेले.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड: शिवराट दिवटे या तरुणाला बेदम मारहाण झाल्याचे समोर आल्यानंतर बीडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अमानुष मारहाणीनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात ते जखमी शिवराज दिवटेची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्या रुग्णालयात जाऊनही अजित पवारांनी ही भेट टाळली ज्यानंतर आता मराठा समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 अजित पवार यांनी परळीमध्ये बेदम मारहाण झालेल्या पिडीत शिवराज दिवटेची भेट न घेतल्याने मराठा समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  मारहाण झालेला शिवराज दिवटे हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहे. याच ठिकाणी आज अजित पवार हे बैठकीसाठी आले होते, अजित पवार हे शिवराज दिवटेची भेट घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अजित पवार हे शिवराज दिवटे याची भेट न घेताच ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून निघून गेले.

तसेच यावेळी अजित पवार यांनी बाह्य विभागाची नूतनीकृत इमारत तसेच मुलांच्या वस्तीगृहाच्या नूतनीकृत इमारतीची पाहणी व स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय बी-बिल्डींग सर्जिकल वार्ड व नूतन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण देखील केले नाही. शिवराज दिवटे याची भेट न घेतल्याने मराठा बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Who is Priyanka Senapati: देशद्रोही ज्योतीसोबत पाकिस्तानची सफर, आणखी एक युट्यूबर तपास यंत्रणांच्या रडारवर

"अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि बारामतीचा विकासाचा विषय आल्यानंतर अजित पवार सक्रिय होतात तर बीडच्या विकासावर मात्र दादा संवेदनाहीन होतात. दादा अत्यंत कोत्या मनाचे आहेत. त्यामुळे शिवराज दिवटे या तरुणाला भेटण्यास गेले नाही. म्हणून आम्ही अजित पवार यांचा धिक्कार निषेध करतो," अशी प्रतिक्रिया मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.