आकाश सावंत
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्लॅन करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यात दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. त्यातील एक आरोपी हा मनोज जरांगे पाटील यांचा अनेक वर्षापासून खंदा समर्थक मानला जातो. त्याचे नाव आहे बीड जिल्ह्यातील गेवराईचा अमोल खुणे. अमोल खुणेला अटक केल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र याच अमोल याची पत्नी आता समोर आली आहे. तिने या हत्येचा कट आणि आपला पती याचा काय संबंध आहे याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.
अमोल खुणे याला अटक केल्यानंतर त्याची पत्नी आता समोर आली आहे. त्यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी आपला पतीन निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आपला पती हा मनोज जरांगे पाटील यांचा खंदा समर्थक आहे. त्यांचे पानही त्यांच्या शिवाय हलत नव्हतं. पहिल्या पासून त्यांनी जरांगेंना साथ दिली. जरांगेंना कुणी काही बोललं तर ते त्यांना हटकत असत. जरांगे पाटीलांना काही बोलू नका असे ही ते सांगत. पण आपल्या पतीला दारू पिण्याचे व्यसन होते. ते अलीकडच्या काळात वाढले होते.
माझ्या पतीला या प्रकरणात फसवले गेले आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांना कुणी तरी सतत दारू पाजत होते. ते घरी ही उशिरा येत होते. नेहमी ते दारूच्या नशेत असत. दारूच्या नशेत त्यांच्याकडून हे सर्व करून घेण्याचा प्लॅन असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय दारूच्या नशेत आपला पती काही तरी बोलून गेला असेल असं ही त्या म्हणाल्या आहेत. दारू प्यालल्या मुळे त्यांचा एखादा शब्द चुकला असेल असं ही त्या म्हणाल्या. दारू पाजून त्यांच्याकडून हे बोलून घेतलं आहे असा दावा ही त्यांनी केला. आपला पती निर्दोष आहे. त्यांना यात अडकवलं जात आहे असं ही त्या म्हणाल्या. पण त्यांना दारू पाजणारे ते किंवा तो कोण होता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
नक्की वाचा - Two wheeler Toll: दुचाकीला टोल का द्यावा लागत नाही? 99 टक्के लोकांना कारणच माहित नाही
त्यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणात नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. असं असेल तर अमोल खुणे हा गेल्या महिनाभर कुणा सोबत वावरत होता. त्याला दारू पाजणारे ते लोक कोण होते हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे दारू पाजणाऱ्या त्या लोकांचा पत्ता लागल्यास पुढचा शोधाचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून या मागे धनंजय मुंडे असल्याचा आरोप केला होता. तर मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यात आता आरोपीची पत्नी समोर येवून त्यांच्या वक्तव्याने या प्रकरणात नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.