जाहिरात

Manoj Jarange: गोळ्या देऊ, गाडीने उडवू.. मनोज जरांगेंच्या हत्येचं असं होतं प्लॅनिंग, धनंजय मुंडेंवर थेट आरोप!

Manoj Jarange Patil PC Allegations On Dhananjay Munde: या संपूर्ण प्रकरणात बीडमधील एका मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Manoj Jarange: गोळ्या देऊ, गाडीने उडवू.. मनोज जरांगेंच्या हत्येचं असं होतं प्लॅनिंग, धनंजय मुंडेंवर थेट आरोप!

लक्ष्मण सोळुंके, जालना:

Manoj Jarange Patil PC On Kill conspiracy:  मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात बीडमधील एका मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत आता स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीच सर्वात मोठा खुलासा केला आहे. 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

याबाबत मनोज जरांगेंनी सांगितले की, "तो बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी जवळचा माणूस हेरला. त्याला परळीला नेले आणि तिथे मोठी बैठक सुरु होती ती सोडून धनंजय मुंडें या व्यक्तीला भेटायला आले. तिथे दुसरा आधीच उपस्थित होता. धनंजय मुंडेंसोबत तो चर्चा करुन बाहेर आलेला. तिथे त्यांची बैठक ठरली"

MHADA Lottery: खुशखबर! मुंबईत लॉटरीशिवाय म्हाडाचे घर मिळणार, पण कोणत्या लोकेशनवर? वाचा डिटेल्स

"पहिल्यांदा रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा असं काम त्यांच्याकडून करुन घ्यायचे होते. मग ते दुसऱ्या मुद्द्यावर आले.  तिसरा मुद्दा गोळ्या देऊन किंवा औषध देऊन घातपात करु असा त्यांचा प्लॅन होता. यासाठी दोन कोटी आणि अडीच लाख एक्स्टा असा हा व्यवहार ठरला. त्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरु केली.  त्यानंतर संभाजीनगरच्या एका स्टॉपवर धनंजय मुंडे त्या आरोपींची गाठ घेण्यासाठी थांबले होते. तुम्हाला मी गोळ्या वगेरे पुरवतो असंही ते म्हणाले."

तसेच  "भाऊबीजेदिवशी पुन्हा हा कट शिजला. आम्हाला गाडी पुरवा गाडीने उडवतो अशी मागणी आरोपींनी केली. तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले नवी गाडी नको, माझ्याकडे जुनी गाडी आहे ती देतो. ती परराज्यातील पासिंगची आहे, असा  खळबळजनक खुलासाही केला. यामध्ये आंतरवलीमधला बडे नावाचाही एकजण आहे. १०, ११ जण यामध्ये सहभागी आहेत. तपासामध्ये या बाबी पुढे येतील. ही वृत्ती राज्याला, गावाला शोभणारी नाही. खून करुन माणूस राजकारणात मोठा होत नाही, असा आरोप करत हे राजकारणी घातक आहेत, याची सखोल चौकशी करा," अशी मागणीही त्यांनी केली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com