Beed News: पत्नीचे सोने मोडून 5 गावांची भागवली तहान! बीडमधील 'जलदूता'चे राज्यात कौतुक

Beed Special Story: जरूड गाव आणि त्या बाजूचे पाच गाव हे नेहमीच होरपळताना पाहायला मिळतात. मात्र या गावात आता एक देवदूत नव्हे तर जलदूत तयार झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मोसीन शेख, बीड:  बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ, अवकाळी गारपीट.. या सगळ्या गोष्टींनी त्रासलेला. मात्र उन्हाळा म्हटलं की शेतकऱ्यासह अनेक खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील लोकांच्या अंगावर काटा येतो, कारण पाणीच मिळत नाही. या पाण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावे लागते. यातच जरूड गाव आणि त्या बाजूचे पाच गाव हे नेहमीच होरपळताना पाहायला मिळतात. मात्र या गावात आता एक देवदूत नव्हे तर जलदूत तयार झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या वर्षीही असाच प्रसंग एका तरुणाने पाहिला गावातल्या लोकांच्या घशाला कोरड पडलं मैलो मैल जाऊन पाणी मिळत नाही, त्यात घरच्या प्रत्येकाच्या लक्ष्मीची पायपीट एका तरुणाला बघवली नाही यासाठी त्याने थेट आपल्या बायकोचं सोनच मोडलं आणि बनला पाच ते सहा गावांचा देवदूत. राजेश काकडे  हे बीडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं जरूड गावचा हा रहिवासी थोडाफार शिकलेले. मात्र लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले. त्यांनी गावची तहान भागवण्यासाठी त्यांनी थेट आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल घेतला.

Advertisement

या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह पाच गावाची तहान देखील या बोरवेलवर भागवली. मात्र कालांतराने या बोरचंही पाणी कमी पडू लागलं आणि त्यात त्याने अजून एक बोर घेऊन पंचक्रोशीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प केला. या संकल्पामुळे उन्हाळ्यात आता जवळपास अनेक गावांची तहान भागते. हा तरुण सध्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जलदूत म्हणून ओळखला जातोय.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Big news: 'ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावं, नाही तर बाहेर पडावं' भाजपचे मंत्री कुणावर भडकले?

गावाला पाणी देण्यासाठी राजेशने स्वतःची बाजरी, डाळिंब आणि मोसंबीचं पीक वाया जाऊ दिले. गावाला देण्यासाठी त्यांनी शेताला पाणी दिलंच नाही ज्यामुळे लाखमोलाचे पीक मातीमोल झाले. दरम्यान, पाणी वाटपासाठी घेतलेला बोर आजही चालतोय आणि त्यासोबत अजून एक बोर गावकऱ्यांसाठी आणि पंचक्रोशीतील येणाऱ्या नागरिकांसाठी त्यांनी घेतला आहे. मात्र यामध्ये कोणाचीही आर्थिक मदत न घेता हा त्याचा संकल्प राजेशने पूर्ण करून दाखवला आहे गेल्या उन्हाळ्यापासून ते या उन्हाळ्यापर्यंत या बोरमुळे गावकऱ्यांसह अनेक परिसरातील नागरिकांना साथ दिली आहे" जो लोकांसाठी करतो त्याला देव साथ देतो "ही म्हण खोटी नाही हे राजेश कडून पाहून कळते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?