Beed Railway Trial: बीड–वडवणी रेल्वे मार्गावर आज ट्रायल रन; बीडकरांना सतर्कतेचा सल्ला

Beed Railway Trial: रेल्वे प्रशासनाकडून बीड–वडवणी रेल्वे मार्गावर चाचणीदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत रेल्वे रुळाजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

Beed News: बीडकरांच्या दशकभराच्या प्रतीक्षेला वेग देणारी मोठी घडामोड आज घडली आहे. बीड–वडवणी रेल्वे मार्गावर आज सकाळी इंजिन चाचणी घेण्यात येत आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे 10 आणि 11 डिसेंबर रोजी सीआरएस तपासणी तसेच स्पीड चाचण्या होणार आहेत. या रेल्वे प्रकल्पामुळे बीड जिल्ह्यातील प्रवास आणि व्यापार दोन्हीला वेग मिळणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून बीड–वडवणी रेल्वे मार्गावर चाचणीदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत रेल्वे रुळाजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: शेतकरी, पादचारी, स्थानिक युवक यांना रेल्वे मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आणि रेल्वे सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  Girls Missing: नवी मुंबईनंतर विदर्भातील 'या' जिल्ह्यातून 3 मुली रहस्यमयरित्या गायब; पालकांची चिंता वाढली)

बीड–परळी मार्गाचाही वेगाने विस्तार सुरू

बीड जिल्ह्याची रेल्वेची मागणी दीर्घकाळ अधांतरी होती. तीन महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर आता बीड–परळी मार्गाचाही वेगाने विस्तार सुरू आहे. या मार्गातील पहिला टप्पा म्हणून वडवणीपर्यंतची सुमारे 30 किलोमीटरची लाईन पूर्ण झाली असून त्यावर आज इंजिन चाचणी सुरू झाली आहे.

या संपूर्ण प्रकल्पाचा तिसरा टप्पा म्हणजे वडवणी–परळी रेल्वे मार्ग. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्हा अखेर महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या रेल्वे नेटवर्कशी थेट जोडला जाणार आहे. प्रवास, उद्योग, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा यासाठी ही रेल्वे जीवदान ठरणार असल्याचे स्थानिकांचे मत आहे. बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वेची धडधड आज पहिल्यांदा जिल्ह्यात उमटली असून, आता अधिकृत उद्घाटन आणि नियमित रेल्वेसेवेसाठी उलटगणती सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Kalyan School: कल्याणमधील नामांकित शाळा रस्ता नसल्याने सलग 3 दिवस बंद; 3000 विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान)

नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

पुणे विभागाने रेल्वे ट्रॅक परिसर पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी जवळच्या गावातील रहिवासी, शेतकरी, गुरेढोरे मालक आणि स्थानिक संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे ट्रॅकवर किंवा जवळ कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, गुरेढोरे ट्रॅकवर भटकू देऊ नयेत, अनधिकृत ठिकाणी ट्रॅक ओलांडू नये, चाचणीच्या दिवसांमध्ये दिवसभर ट्रॅकपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन केले आहे.

Topics mentioned in this article