मोसीन शेख, बीड: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाने राज्यात वातावरण चांगलेच तापलं आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप एक आरोपी फरार असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दुसरीकडे या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला असून खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडही जेलमध्ये आहेत. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा हाती लागला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून एक मोठा खुलासा झाला असून सर्व आरोपी एकत्र असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह, सुदर्शन घुले, विष्णू चाटे,कृष्णा आंधळे, यांच्यासह निलंबित पोलीस कर्मचारी राजेंद्र पाटीलही एकत्र असल्याचे दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्यादिवशी आवादा कंपनीकडे खंडणीची मागणी केली होती त्याचदिवशी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी हे सर्व आरोपी एकत्र आल्याचे या व्हिडिओमध्ये
दिसत आहे. विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेर असलेल्या एका दुकानातील हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात माझा कोणताही संबंध नसल्याचा दावा वाल्मिक कराड करत आहे. अशातच हा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा :लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार? विखे-पाटलांनी दिली माहिती
सुरेश धस यांचे गंभीर आरोप?
दरम्यान, या व्हिडिओवरुन आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. आका, विष्णू चाटे, घुले हे सर्व एकत्र दिसत आहेत. या प्रकरणात पी आय पाटील याला सहआरोपी केले पाहिजे. मी जे आरोप केले त्याचे पुरावे एसआयटीनं पुढे आणले आहेत. आकाचा संबंध आहे हे स्पष्ट होते आहे, अवादा कंपनीच्या शिंदेंना पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि मारत आणलं होतं. तो मी नव्हेच म्हणणारा, हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना? मी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली आहे.. असं ते म्हणालेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world