भंडारा: भंडाऱ्याच्या कोदुर्ली येथे गावकऱ्यांनी वाघासोबत सेल्फी व फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यााचा प्रकार समोर आला होता. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल झाला होता. अशाप्रकारे जीव धोक्यात घालून वाघासोबत फोटोसेशन केल्याचे समोर आल्यानंतर आता वन विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सेल्फी व फोटो करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवस अगोदर भंडारा जिल्ह्यातील कोदुर्ली येथे गावकऱ्यांचा वाघासोबत सेल्फी काढण्याचा व्हिडिओ समोर आला होता. नागरिकांनी वाघाजवळ गर्दी करत त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारानंतर आता वन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. प्रशासनाकडून वाघाला जेरबंद करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसेच वाघासोबत सेल्फी आणि फोटो काढणाऱ्या गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून कारवाई करण्यात येणार आहे. बीटी10 वाघिणीचा बछडा आईपासून दुरावला असून वाघ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी व नवीन जंगलाच्या शोधासाठी भटकंती करत असून थकलेला वाघ अड्याळ वनपरिक्षेत्र परिसरात सुस्ताहून बसलेला होता. दरम्यान गावकऱ्यांनी सेल्फी व फोटो काढण्यासाठी गर्दी करत घेराव केल्याच्या संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर आता वन विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
( नक्की वाचा : Exclusive : नाना पटोलेंना कोणती गोष्ट जिव्हारी लागली? नाराज नानांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली अट )